केज दि ३०(प्रतिनिधी)
जागतिक पहिल्या भारतीय संसदेचे जनक, आदर्श प्रशासक , समतानायक, क्रांतीसुर्य , जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या ९२० व्या जयंती निमित्त केज येथे प्रतिमा पूजन करण्यात आले.
जयंतीचे औचित्य साधून उपजिल्हा रुग्णालय केज येथे रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ सचिन राऊत,डॉ चाटे, डॉ आशिष मुळे,डॉ हनुमंत सौदागर, दिनकर राऊत,रमेश इतापे, मन्मथ माऊली सेवा प्रतिष्ठान चे अध्यक्ष डॉ.वैजनाथ शेटे , सचिव उमाकांत बोधने ,चंद्रशेखर शेटे ,भाग्येश अन्नदाते, वैजनाथ हलगे ,मल्लिकार्जुन स्वामी आदींची उपस्थिती होती.सामाजिक उपक्रमातून जयंती साजरी करण्यात आली.
महात्मा बसवेश्वरांनी अंधश्रद्धा अनिष्ट रूढी परंपरा याविरुद्ध बंड करून विद्रोह केला होता.
महात्मा बसवेश्वरांचे विचार सर्वांनी आत्मसात करावेत असे मत उपस्थितांनी व्यक्त केले व्यक्त केले
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्वांनी परिश्रम घेतले.
सोबत फोटो









Leave a Reply