वोट चोरी विरोधात काँग्रेसचे बीडमध्ये आंदोलन.
SIR च्या माध्यमातुन मतांची चोरी करणाऱ्या ज्ञानेश कुमार यांना बडतर्फ करुन तत्काळ अटक करा – राहुल सोनवणे
केज दि.२८ – बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे यांच्या नेतृत्वात आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ज्ञानेश कुमार यांच्या प्रतिमेस जोडे मारून आंदोलन करण्यात आले.
यावेळी बोलताना सोनवणे म्हणाले की, भारतीय लोकशाहीला जगात अनन्यसाधारण महत्त्व असताना लोकशाहीत निवडणुका या पारदर्शक व्हायला हव्यात. निवडणूक आयोग हे स्वायत्त व स्वतंत्र असताना सध्या मात्र आयोगाचे आयुक्त सत्ताधारी पक्षाचे बाहुले झाल्याचे दिसुन येत आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार व आयोगातील इतर सदस्यांचा अवमेळ जगजाहीर असताना एस आय आर च्या नावाखाली संविधान आणि लोकशाहीला मानणाऱ्या मतदाराला वगळण्याचे काम ज्ञानेश कुमार हे सत्ताधारी पक्षाशी संगणमत करून करत असल्याचा आरोप सोनवणे यांनी केले त्याचबरोबर ज्ञानेश कुमार यांना तात्काळ बडतर्फ करून अटक करण्याची मागणी देखील करण्यात आली.
यावेळी या आंदोलनास ज्येष्ठ नेत्या सुशीला मोराळे, दादासाहेब मुंडे, बाळासाहेब ठोंबरे, गणेश बजगुडे, प्रकाश देशमुख, नवनाथ थोटे, गणेश राऊत, इलियास टेलर, गणेश जवकर, रामधन जमले, दत्ता कांबळे, अविनाश डपरे, संतोष निकाळजे, रमेश पाटील, महावीर मस्के, प्रकाश मुंडे, फारुख भाई, महेश बेदरे, शिवाजी कोठुळे, प्रवीण खोडसे, शिवाजी देशमुख, बहाद्दूर भाई, रणजित देशमुख, संभाजी जाधव, विजय पवार, शेख अमर, प्रवेश कुरेशी, शेख अर्शद, नगरसेवक कुरेशी, नगरसेवक बब्बू भाई, मोहम्मद खामरुद्दीन याबरोबर असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.









Leave a Reply