केज/प्रतिनिधी
गणेशोत्सवाच्या काळात धार्मिक उपक्रमांसोबतच सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. विविध तपासण्यांमुळे नागरिकांना त्यांच्या आरोग्यविषयक समस्या जाणून घेता येणार असून, आवश्यकतेनुसार पुढील उपचारांसाठी मार्गदर्शनही मिळणार आहे.
आयोजनामागील उद्देश व नियोजनाची थोडक्यात प्रस्तावना केली. धावपळीच्या दैनंदिन जीवनात कामाच्या व्यापामुळे आपण अनेकदा आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे आजाराचे वेळेवर निदान होण्यासाठी प्रत्येकाने नियमित आरोग्य तपासणी करून घेणे आवश्यक आहे. याच उद्देशाने हे विशेष मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आल्याचे संगम गणेश मंडळाचे अध्यक्ष दीपक भोसले यांनी सांगितले.
शिबिरामध्ये रक्तदाब, रक्तातील साखर, लॅब टेस्ट, डेंटलची तपासणी, नेत्र तपासणी, एक्स-रे, डायलेसिस, आयुष्मान कार्ड व स्त्रीरोग, ईसीजी यासह विविध आजारांची तपासणी करण्यात आली.
संगम गणेश मंडळ, आयोजित श्री गणेशा आरोग्याचा आरोग्य अभियान.. अंतर्गत सामुदायिक आरोग्य तपासणी शिबीरा मध्ये अध्यक्ष दीपक भोसले,उपाध्यक्ष रोहित औटी सचिव सदस्य यांनी मोलाचे सहकार्य केले.
“गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता समाजोपयोगी उपक्रमांचा उत्सव व्हावा, हा आमचा सातत्याने प्रयत्न असतो. याच उद्देशाने यंदा विविध नामांकित रुग्णालये व संस्थांच्या सहकार्याने आरोग्य शिबिरांचे आयोजन केले आहे. नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि आवश्यक उपचाराबाबत सल्ला मिळणार आहे. विशेषतः गरजू नागरिकांना याचा लाभ मिळावा बाप्पाच्या आशीर्वादाने हा आरोग्योत्सव होत असून संगम गणेश मंडळाचे हे सेवाकार्य यापुढेही असेच सुरू राहील.”









Leave a Reply