जिद्दीच्या जोरावर प्रविणने मिळवले यश.

जिद्दीच्या जोरावर प्रविणने मिळवले यश;

एमपीएससीत उत्तीर्ण होऊन सचिवालयात क्लार्क/सहायक पदावर नियुक्ती;

“तरुणांसाठी प्रेरणादायी प्रवास”

केज!प्रतिनिधी

जिद्द, चिकाटी आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत केज येथील उमरी रोड परिसरात राहणाऱ्या प्रविण भारत शिंपले या युवकाने एमपीएससी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. एमपीएससी ग्रुप क्र. २०२४ अंतर्गत सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या परीक्षेत उत्तीर्ण होत त्याची नवी मुंबई येथील सचिवालयात क्लार्क/सहायक पदावर नियुक्ती झाली आहे.
प्रविणचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत होते. आई-वडील शेतमजुरी करून त्याच्या शिक्षणासाठी अहोरात्र परिश्रम घेत होते.

वेळोवेळी प्रविण ला जवळच्या मित्रांनाही शिक्षणासाठी लागेल ती मदत केली आहे.

या कष्टाचे चीज करत प्रविणने आपल्या मेहनतीच्या जोरावर हे यश मिळवले आहे.
त्याच्या या यशामुळे केवळ शिंपले कुटुंबातच नव्हे, तर मित्रपरिवार आणि परिसरातही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रविणची ही यशोगाथा अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!