केज बीड जिल्हा “मन की बात” संयोजक पदी सुनिल भाऊ घोळवे यांची फेर निवड. Nandkumar More Jul 2, 2026 0 http://भाजप संघटन बळकट केल्याची पावती;’मन की बात’ केज पूर्व मंडळ संयोजकपदी सुनील भाऊ घोळवे यांची फेरनिवड,तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव; मुंदडा परिवाराच्या कट्टर समर्थकाला पुन्हा मोठी जबाबदारी केज/प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीचे संघटन अधिक बळकट करण्यासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या उपक्रमाचा आवाज तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी गेल्या पाच वर्षांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सुनील घोळवे यांची ‘मन की बात’ केज पूर्व मंडळ संयोजकपदी पुन्हा एकदा फेरनिवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे केज तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार निवडी जाहीर भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण,लोकनेत्या पंकजाताई मुंडे,माजी खासदार डॉ.प्रीतमताई मुंडे आणि बीड जिल्हाध्यक्ष शंकर भाऊ देशमुख यांच्या आदेशा नुसार बीड जिल्हा ‘मन की बात’ संयोजक, सहसंयोजक व मंडळ संयोजकांच्या अधिकृत निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत.यामध्ये केज पूर्व भागाची धुरा पुन्हा एकदा सुनील भाऊ घोळवे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. निष्ठा आणि कामाची मिळाली पावती सुनील भाऊ घोळवे हे भारतीय जनता पार्टीचे तालुका सरचिटणीस असून केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा,युवा नेते अक्षय भैय्या मुंदडा आणि ज्येष्ठ नेते तथा अंबाजोगाईचे नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा (काकाजी) यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात.गेल्या पाच वर्षांत त्यांनी पक्ष संघटनेत सक्रिय राहून ‘मन की बात’कार्यक्रमाचे अत्यंत नेटके आणि प्रभावी नियोजन केले होते.पक्षाशी असलेली त्यांची निष्ठा आणि अविरत परिश्रम लक्षात घेऊनच पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या खांद्यावर पुन्हा ही जबाबदारी सोपवली आहे. कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण सुनील भाऊ घोळवे यांच्या फेरनिवडीची घोषणा होताच केज पूर्व मंडळातील भाजप पदाधिकारी,कार्यकर्ते आणि नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. “पक्षश्रेष्ठींनी आणि मुंदडा परिवाराने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवून आगामी काळात ‘मन की बात’ उपक्रम केज पूर्व भागातील प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवू असा विश्वास सुनील भाऊ घोळवे यांनी यावेळी व्यक्त केला. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून कौतुक केले जात आहे.
केज बीड जिल्हा वोट चोरी विरोधात काँग्रेसचे बीडमध्ये आंदोलन. SIR च्या माध्यमातुन मतांची चोरी करणाऱ्या ज्ञानेश कुमार यांना बडतर्फ करून तात्काळ अटक करा – राहुल सोनवणे. Nandkumar More Sep 28, 2026
केज बीड जिल्हा केज येथील स्वामी समर्थ वृद्धाश्रमात नगराध्यक्षा सौ. सिताताई बनसोड यांचा वाढदिवस उत्साहात साजरा. Nandkumar More Sep 22, 2026
केज संगम गणेश मंडळ, लोंढे गल्ली आयोजित श्री गणेशा आरोग्याचा आरोग्य अभियान.. अंतर्गत सामुदायिक आरोग्य तपासणी शिबीर संपन्न. Nandkumar More Sep 17, 2026
केज बीड जिल्हा बीड जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न; खा. रजनी पाटील यांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन. Nandkumar More Sep 9, 2026
केज स्वामी दयानंद प्रतिष्ठान संचलित राजर्षी शाहू विद्या मंदिर केज येथे पालक मेळावा उत्साहात संपन्न; पालकांचा लाभला उत्स्फूर्त सहभाग Nandkumar More Sep 7, 2026
Leave a Reply Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment Name* Email* Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
केज बीड जिल्हा वोट चोरी विरोधात काँग्रेसचे बीडमध्ये आंदोलन. SIR च्या माध्यमातुन मतांची चोरी करणाऱ्या ज्ञानेश कुमार यांना बडतर्फ करून तात्काळ अटक करा – राहुल सोनवणे. Nandkumar More Sep 28, 2026
केज बीड जिल्हा केज येथील स्वामी समर्थ वृद्धाश्रमात नगराध्यक्षा सौ. सिताताई बनसोड यांचा वाढदिवस उत्साहात साजरा. Nandkumar More Sep 22, 2026
केज संगम गणेश मंडळ, लोंढे गल्ली आयोजित श्री गणेशा आरोग्याचा आरोग्य अभियान.. अंतर्गत सामुदायिक आरोग्य तपासणी शिबीर संपन्न. Nandkumar More Sep 17, 2026
Leave a Reply