केज/ प्रतिनिधी
लोकाश्रय सामाजिक संस्था, जवळबनतर्फे आनंदगांव ता. केज जि. बीड यांच्यातर्फे होतकरु व अत्यंत गरीब अशा विद्यार्थ्याना शालेय साहित्याचे पूर्ण किट( दफ्तर, कम्पास, वह्या, पेन) इत्यादी साहित्य मोफत वाटप करण्यात आले.
आनंद ग्रामिण विकास प्रतिष्ठाण, आनंदगांव ता. केज जि. बीड व स्वानंद सार्वजनिक वाचनालय, आनंदगांव ता. केज जि. बीड च्या कार्यालयात हे शालेय साहित्याचे वाटप संस्थेचे संचालक प्रा. शिरीष बालासाहेब भाकरे व मधुकर भाकरे मामा यांच्या हस्ते हे शालेय साहित्याचे किट वाटप करण्यात आले.
यावेळी सरपंच सौ.अंजना गोविंद गायकवाड, हणुमंत चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी १. लक्ष्मी बापू चवरे, प्रथमेश बापू चौरे, विक्रम हणुमंत गायकवाड, प्रतिक्षा बापू चौरे, प्रेम बापू चौरे या पाच गरिब व होतकरु विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे किट वाटप करण्यात आले.
मान्यवरांचे सत्कार दोन्ही संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, जेष्ठ विचारवंत, जेष्ठ समाजसेवक, सुप्रसिद्ध वक्ते डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड यांनी पुष्पहार देवून केला.
यावेळी विद्यार्थी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सरपंच सौ.अंजना गोविंद गायकवाड यांनीही शुभेच्छा दिल्या









Leave a Reply