राजर्षी शाहू विद्या मंदिर, केज येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.

राजर्षी शाहू विद्या मंदिर, केज येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.

केज! प्रतिनिधी

स्वामी दयानंद प्रतिष्ठान केज संचलित राजर्षी शाहू विद्या मंदिर, केज येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

ध्वजारोहण संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. राहूल देशमुख यांच्या हस्ते पार पडले. यावेळी संस्थेचे सचिव मा. श्री. जी. बी. गदळे, संचालक श्री. व्ही. डी. डोंगरे, सभासद श्री. रामधन डापकर, मुख्याध्यापिका श्रीमती बी. बी. चाटे यांची विशेष उपस्थिती होती तसेच शाळेचे सेवानिवृत्त शिक्षक एस. ए. डापकर, बी. डी. चौधरी व शाळेतील ज्येष्ठ शिक्षक व्ही. बी. यादव यांचीही उपस्थिती होती. उपस्थित सर्वांनी राष्ट्रध्वजास मानवंदना देत देशाचे सार्वभौमत्व व एकता जपण्याचा संकल्प केला.

सकाळी काढण्यात आलेल्या प्रभात फेरीत विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषणा देत परिसर दुमदुमून सोडला.ध्वजारोहणानंतर झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते व भाषणे सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

याच वेळी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह विशेष सत्कार करण्यात आला. इयत्ता चौथीतून कु. किरण अनिल नागरगोजे हिने, तर इयत्ता सातवीतून कु. संस्कृती जितेन्द्र रोडे, चि. रुद्राक्ष प्रवीण डापकर, चि. बाबुराव शिवाजी भोसले, चि. अमित किशोर दुनघव आणि कु. वैष्णवी नंदलाल मिसाळ यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केले.

कार्यक्रमास सर्व शिक्षकवृंद, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.खाऊ वाटपानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!