केज!प्रतिनिधी.
केज विधानसभा मतदारसंघात आता खऱ्या अर्थाने निवडणूक रंगात आली आहे. या निवडणुकीत पंचेवीस उमेदवार निवडणूक लढवत असले तरी आ.नमिता मुंदडा यांनी मतदारसंघात आजवर केलेल्या विविध विकासकामांच्या बळावर त्यांचे पारडे जड झालेले पहायला मिळत आहे. यामुळे त्यांच्या विरोधकांची मात्र मोठी दमछाक झाली आहे. विकासकामांच्या जोरावर केज मतदारसंघातील जनता या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार नमिताताई मुंदडा यांनाच निवडून देणार असल्याचे दिसून येत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने काळेगाव घाट, हनुमंत पिंपरी,आरणगाव मसाजोग, कापरेवाडी, बोरगाव ,भोपला, सारुक वाडी , हदगाव, डोका मांगवडगाव ,सातेफळ लाखा ,या गावांना भेट देऊन मतदारांशी संवाद साधला , मतदारसंघात केलेली विकास कामं हीच आपली बलस्थाने असून याच्या जोरावरच मतदार पुन्हा एकदा निवडून देऊन काम करण्याची संधी देतील . त्यांनी केलेल्या विकास कामांमुळेच त्यांना हि निवडणूक सोपी झालेली आहे आणि प्रचारांमध्ये मोठी आघाडी घेतली असून त्यांचे पारडे जड झालेले आहे यामुळे त्यांचा विजय आता कोणालाही रोखता येणार नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
यावेळी त्यांनी येत्या २० तारखेला मला आपले मतदानरूपी आशीर्वाद देऊन पुन्हा एकदा जनतेच्या सेवेची संधी द्यावी, अशी विनंती केली. यावेळी चिंचोली सर्कल मधील जनतेने नमिता मुंदडा यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचा निश्चय केला. काळेगाव घाट येथील कॉर्नर सभेत चांगला प्रतिसाद लाभला , महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.यावेळी सुनील गलांडे ,मा. सभापती विष्णू घुले , रामचंद्र गाताडे,राख, फरके अण्णा , प्रा.राहुल गदळे ,किसन कदम,काळेगाव घाट सरपंच अविनाश गाताडे , आरणगाव सरपंच सचिन शिरसाट , डॉ.अमोल जाधव, हनुमंत सुरवसे,आश्रुबा भांगे, यांच्या सह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .









Leave a Reply