बीड /प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीचे मतदान बुधवार दि.२० नोव्हेंबर २०२४ रोजी पार पडले.जिल्ह्यातील सहा मतदार संघातील उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीन मध्ये बंद झाले आहे.जिल्ह्यात बीड,आष्टी,माजलगाव,केज,परळी,गेवराई अशी सहा मतदारसंघ आहेत प्रत्येक मतदारसंघात चुरशीच्या लढती झालेल्या पाहायला मिळत आहेत.१४ दिवस प्रचार केल्यानंतर दि.२० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवातझाली व सायंकाळी उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली.तर केज मतदार संघामध्ये रात्री अकरा वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार अशी माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी विलास तरंगे यांनी दिली आहे.बीड जिल्ह्यातील सहा मतदार संघातील उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीन मध्ये बंद झाले आहे.दि.२३ नोव्हेंबर २०२४ रोजी निकाल लागणार आहे.या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार याची आतुरता जिल्हा वासियांना लागली आहे.











Leave a Reply