डॉ. हनुमंत सौदागर मराठवाडा भूषण आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

डॉ हनुमंत सौदागर मराठवाडा भूषण आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.

केज दि १(प्रतिनिधी)

तालुक्यातील आनंदगाव येथील भूमिपुत्र डॉ हनुमंत सौदागर यांना मराठवाडा भूषण आदर्श शिक्षक पुरस्काराने तुळजापूर येथे मान्यवरांच्या हस्ते सन्मानित
करण्यात आले. याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
महाविद्यालयत्तर उपक्रम पर्यावरण संवर्धन, जल साक्षरता, स्वच्छता अभियान, उपेक्षित विद्यार्थ्यांना शिक्षण कृतिशील उपक्रम अशा विविध कामाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
पुरस्कार वितरण सोहळ्यास
जि प धाराशिवचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गायकवाड,इतिहास अभ्यासक डॉ श्रीमंत कोकाटे,
तुळजापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोल ताकभाते,संयोजन समितीचे राजकुमार धुरगुडे,महेंद्र धुरगुडे, आदी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
स्वातंत्र्य सेनानी भानुदासराव धूरगुडे यांच्या जयंतीनिमित्त मराठवाडा समन्वय समिती पुणे यांच्या वतीने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यावर्षीचा हा प्रतिष्ठेचा मराठवाडा भूषण आदर्श शिक्षक पुरस्कार तुळजापूर येथे देऊन गौरविण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!