केज मतदार संघात नमिताताई मुंदडा प्रचारातून सर्वात पुढे
केज! प्रतिनधी
विधानसभा मतदारसंघात भाजपा महायुतीच्या उमेदवार विद्यमान आमदार नमिता अक्षय मुंदडा या एकुण उमेदवारांमध्ये प्रचार कार्यामध्ये नंबर एकवर असल्याचे पहायला मिळत आहे. अत्यंत नियोजनपूर्वक प्रचारयंत्रणा त्यांनी कामाला लावली असल्याने आणि मतदारसंघात केलेल्या विकास कामांमुळे त्यांना हि निवडणूक सोपी जात आहे. गावागावात त्यांच्या समर्थकांनी ताईंच्या विजयासाठी डोअर टू डोअर जाऊन सर्वसामान्य लोकांमध्ये संवाद साधण्याचे काम सध्या जोरदारपणे सुरू केलेले दिसते आहे.
अनेक ठिकाणी उत्स्फूर्तपणे आ नमिता मुंदडा यांचे स्वागत केले जात आहे. तगडी प्रचारयंत्रणा त्यांचेकडे असल्याने मतदारसंघात सर्वत्र त्यांच्याच नावाचा बोलबाला सुरू असलेला पहायला मिळत आहे. याबरोबरच लाडकी बहिण योजना, वयोश्री योजना तसेच रस्त्याची कामे, देवस्थान विकासाची कामे, स्व लोकनेते गोपीनाथराव मुंडे सांस्कृतीक सभागृहाचे काम, नगरोस्थानचे काम, शहरातील मुख्य रस्ते या आशा अनेक कारणांमुळे आ नमिता मुंदडा यांना हि निवडणूक सोपी झालेली आहे. या दोन वर्षांमध्ये तर त्यांनी मतदारसंघात विकासकामांचा धडाकाच सुरू केला होता. मतदारसंघात त्यांनी अगदी रेकॉर्ड ब्रेक निधी आणलेला आहे. यामुळे मतदारसंघाचं रुपडं बदललेलं आहे. विकास कामांची हि गंगा मतदारसंघात असीच अखंड सुरू ठेवण्यासाठी या निवडणुकीत देखील आ नमिता मुंदडा यांनाच निवडून द्यावे लागणार असल्याचे सुज्ञ मतदार बोलत आहेत. यामुळे या चुरशीच्या लढतीत देखील आ नमिता मुंदडा यांचेच पारडे जड झालेले पहायला मिळत आहे. स्व लोकनेत्या डॉ विमलताई मुंदडा यांच्या प्रमाणेच सुनबाई आमदार नमिता मुंदडा या देखील मतदारसंघात लोकप्रिय झालेल्या आहेत आणि विविध विकासकामे मतदारसंघात खेचून आणण्याची जिद्द आणि चिकाटी हि देखील नमिता मुंदडा यांचेमधे आहे. हे मतदारांनी ओळखले असल्याने या निवडणुकीत त्यांना भरभरून प्रतिसाद मिळत असल्याचे पहायला मिळत आहे आणि प्रचार कार्यामध्ये त्याच नंबर एकवर असल्याचे बोलले जात आहे.











Leave a Reply