केज/प्रतिनिधी, दिनांक 20/01/2025 ते 22/01/2025 या कालावधीत जिल्हा परिषद,बीड शिक्षण विभाग ( माध्यमिक ) आयोजित 52 वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन, सिंदफणा पब्लिक स्कूल, फुलेपिंपळगाव , ता.माजलगाव जि. बीड येथे संपन्न झाले . यामध्ये साने गुरुजी निवासी विद्यालयाची विद्यार्थिनी कु. ठोंबरे पूजा परमेश्वर हिची दिव्यांग गटातून प्रथम क्रमांक मिळवून अमरावती येथे होणाऱ्या 52 व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झालेली आहे. या विद्यार्थिनीस प्राचार्य डॉ. कविता गित्ते मॅडम, विज्ञान विषय शिक्षिका डॉ.मनिषा नागरगोजे,श्रीम.श्रुती लहाने, श्री दस्तुरे, व श्री काळे यांचे मार्गदर्शन लाभले.
सदर विद्यार्थिनीची 52 व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष ॲड मा.उद्धवरावजी कराड साहेब, संस्थेचे उपाध्यक्ष श्री राजेशजी कापसे साहेब ,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेत शुभेच्छा दिल्या आहेत.









Leave a Reply