*खा.बजरंग सोनवणे करणार* *आज रेल्वे चाचणीची पाहणी* *नवगण राजुरी रेल्वे स्थानक येथे देणार भेट*

 

बीड: अनेक वर्ष रेल्वेची बीडकरांनी प्रतिक्षा केली. ही प्रतिक्षा आता संपत असून दि.४ रोजी विघनवाडी ते राजुरी आणि आज दि.५ रोजी विघनवाडी ते बीड रेल्वेची जलदगती चाचणी होत आहे. आज दि.५ रोजी सकाळी विघनवाडी ते नवगण राजुरी रेल्वे चाचणीची खा.बजरंग सोनवणे पाहणी करणार आहेत.

बीडला रेल्वे आलीच पाहिजे, अशा घोषणा मागील अनेक वर्षांपासून सुरू होत्या. यासाठी आंदोलने आणि मोर्चेही झाले. अहिल्यानगर ते बीड या २६१ कि.मी. अंतराच्या रेल्वेसाठी बीडवासियांचा गेल्या तीन दशकापासून संघर्ष सुरू आहे. पहिल्या टप्प्यात अहिल्यानगर ते नारायणडोह या ७ कि.मी.च्या अंतराचे काम पूर्ण झाले. पुढे टप्प्याने काम सुरू होते. अंमळनेर येथे रेल्वे येऊन थांबली होती. रेल्वेपुढे अडथळ्याची शर्यत होती. सदरील आडथळे पुर्ण करण्यासाठी खा.बजरंग सोनवणे यांनी लक्ष घातले आणि अडथळ्यांची शर्यत संपत आली. दि.४ फेब्रुवारी रोजी विघनवाडी ते राजुरी अशी रेल्वे चाचणी झाली तर आज ५ फेब्रुवारी रोजी राजुरी ते बीड या नवीन लोहमार्गावर हायस्पीड रेल्वेची चाचणी घेण्यात येत आहे. आज प्रत्यक्षात बीड शहरात रेल्वे जलदगतीने दाखल होणार असल्याने हा दिवस शहरवासियांसाठी सुवर्ण अक्षरांनी लिहीला जाणार आहे.आज खा.बजरंग सोनवणे हे विघनवाडी -नवगण राजुरी या मार्गात होत असलेल्या जलदगती रेल्वे चाचणीची पाहणी करणार आहेत. सकाळी ९.४५ वाजता ते नवगण राजुरी येथील रेल्वेस्थानक येथे भेट देतील, असे नियोजीत दौऱ्यात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!