ब्र. भुत रामकृष्ण महाराजांच्या जयजयकाराने अवघी वरपगाव नगरी दुमदुमली. “नागेशपुरी महाराज व रामकृष्ण महाराजांनी भक्तांना जीवन जगण्याची प्रेरणा दिली – महंत भगवान महाराज वरपगावकर.

ब्र. भुत रामकृष्ण महाराजांच्या जयजयकाराने अवघी वरपगाव नगरी दुमदुमली.

“नागेशपुरी महाराज व रामकृष्ण महाराजानी भक्तांना जीवन जगण्याची प्रेरणा दिली …महंत भगवान महाराज वरपगावकर
————————————————
केज :- ब्र. भुत .रामकृष्ण महाराजांच्या जयजयकाराने वरपगाव नगरी दुमदुमली असून यावेळी मान्यवरांनी व हजारो भाविक भक्तगणांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी अध्यात्मिक क्षेत्रातील अनेक महाराज उपस्थित होते. त्यामुळे परिसर भक्तिमय दिसून आला व गावाला यात्रेचे स्वरूप आले होते .
श्रीक्षेत्र साधू शिवरामपुरी मठ संस्थान वरपगाव ता केज येथील ब्र .भुत .रामकृष्ण महाराज यांच्या १9 व्या अखंड हरिनाम सप्ताह व भागवत कथा महंत भगवान महाराज शास्त्री यांच्या मार्ग दर्शनाखाली 11 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी दरम्यान भव्य दिव्य हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात संपन्न झाला

या सप्ताहामध्ये ज्ञानेश्वरी पारायण श्री परम पुज्य ह भ प महेश महाराज टेकाळे व ह. भ. प निलेश महाराज माने. ह. भ. प. सुकळीकर यांनी तर दुपारी 2 ते 5 वाजेपर्यत भागवत कथा प पु रामकृष्ण महाराज शासञी आंळदीकर यांच्या रसाळ वाणी युक्त कथेमुळे भाविक व भक्तगण आणि विशेष्ःत महिला वर्गाची अलोट गर्दी झाल्यामुळे हा परिसर गजबजून गेला होता. यावर्षी हजारोंच्या संख्येने पंचक्रोशीतील भक्त उपस्थित होते. भक्तांमध्ये प्रचंड मोठा उत्साह संचारलेला दिसला.

या सप्ताहामध्ये महाराष्ट्रातील अनेक नामवंत कीर्तनकार मान्यवरांची अमृततुल्य कीर्तने झाली. यावेळी आपापल्या परीने अनेक भाविकांनी अन्नदान करून उपस्थितांची सेवा केली. विशेष म्हणजे टँकट्ररमधे भरून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. येथे एक भक्ताचा महापूर आल्याचे दिसले.

हभप मच्छिन्द्र महाराजानी अनेकांनी अभिषेक केले. त्यानंतर हभप भगवान महाराज यांचे अमृततुल्य काल्याचे कीर्तन संपन्न झाले. त्यांनी समाजातील प्रत्येक घटकाने व्यसनापासून दूर राहून जिवनात आदर्श निर्माण करावा आणि साधू हे वैराग्य मूर्ती असून ते साधुच असतात नागेशपुरी महाराज आणि वैकुंठवासी रामकृष्ण महाराज हे महान संत होते त्यांनी समाज प्रबोधन करून समाजाला एक नवी दिशा देण्याचे महान कार्य केले त्यामुळे येथे भक्तांची झालेली मांदियाळी या वरून सिद्द होते कि वै रामकृष्ण महाराज तपश्चर्या आणि त्यांची भक्तावर असलेले प्रेम ही त्याची पावती म्हणजे येथे झालेली हजारो भक्तांची उपस्थिती होय असे विचार मांडत महंत रामकृष्ण महाराज हे अध्यात्मिक प्रबोधनाचे चालते बोलते विद्यापीठ होते असे विचार मांडले मंहत भगवान महाराजांनी काल्याच्या अमृतुल्य किर्तनातुन‌ मांडले.
या सप्ताहमध्ये भक्तांनी विविध किर्तनकारांच्या विचारांना आत्मसात केले.
या सप्तहात शिवरामपुरी मठ संस्थान वरपगाव येथे अनेकांनी विविध दुकाने लावली होती, त्यामुळे या परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती

रामकृष्ण महाराज यांच्या जयघोषाने ही नगरी दुमदुमून गेली होती. त्या नंतर उपस्थित भक्तांनी महाप्रसादचा लाभ घेतला यावेळी पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते

चौकट
अनेक मान्यवरांची उपस्थिती
यावेळी ह भ प प्रकाश साठे महाराज , ह भ प . ज्ञानेश्वर महाराज लांब दिलीप महाराज खानापूरकर, , हभप दीपक महाराज मेटे लव्हरी ह. भ प. बोराडे हभप गणेश महाराज माळेगावकर, हभप, परमेश्वर महाराज जेष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा, सुनील गलांडे, किसनदादा कदम, भगवान केदार अकलूज चे प्राचार्य डॉ आबासाहेब देशमुख, डॉ टी एल देशमुख सह पंचक्रोशीतील मान्यवर उपस्थित होते.यावेळी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी वरपगाव ग्रामस्थांनी वतीने भक्तगणाचे आभार मानले

चौकट–रामकृष्ण महाराजांनी काकाजी आसे नाव ठेवले.. मुंदडा
. मुंदडा परिवाराच्या राजकीय प्रवासात शिवराम पुरी मठसंस्थानाची सतत प्रेरणा राहिली आहे.गेल्या 30 वर्षा पासून रामकृष्ण महाराजांनी एका त्यांच्या कीर्तनात मला दिलेले “काकाजी” हे सार्वजनिक नाव पुढे जनसामान्यांच्या तोंडी बसले व आज कोणीही व्यक्तीने ‘काकाजी’ म्हटलं की मला अत्यंत त्यागी व महान संत रामकृष्ण महाराजांची आठवण येते. आपला परिवार कायम या मठसंस्थानाच्या सेवेत राहील.—

नंदकिशोर मुंदडा, सामाजिक कार्यकर्ते.
चौकट..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!