*साबला येथील लोकप्रिय सरपंच सौ.जनाबाई नरहरी काकडे यांचा महाराष्ट्ररत्न आदर्श सरपंच या पुरस्काराने गौरव.*                                         *”पुणे येथील ” ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ” स्मारक भवन , गंजपेठ , पुणे येथे होते . तसेच साबला येथील लोकप्रिय सरपंच सौ . जनाबाई नरहरी काकडे यांचा ” महाराष्ट्र रत्न आदर्श सरपंच या पुरस्काराने गौरव.*

 

 

केज!प्रतिनिधी

 

केज तालुक्यातील मौजे साबला येथील ग्रामपंचायत च्या लोकप्रिय सरपंच सौ . जनाबाई नरहरी काकडे यांना मानाचा ” महाराष्ट्र रत्न आदर्श सरपंच ” सन – 2025 या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले तसेच माननीय धनराज सोनवणे – ग्रामपंचायत अधिकारी , ग्रामपंचायत कार्यालय , साबला यांनाही ” महाराष्ट्र रत्न आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार ” – सन – 2025 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजक –

माननीय ॲड . शंकरराव चव्हाण . विश्वनाथ फांऊडेशन , महाराष्ट्र राज्य , भारत . दैनिक शिवजागर . या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय प्राजक्ता गायकवाड – सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री , मुंबई महाराष्ट्र राज्य . ” उत्कृष्ट सिने अभिनेत्री पुरस्कार प्राप्त ” तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय ओमकार हनुमंत माने सुप्रसिध्द सिने दिग्दर्शक , मुंबई . माननीय स्मिता राठोड / चावडा . मिसेस ग्लोबल इंडिया . मानतीय सुजाताताई चिंता ( उद्योजिका ) डारेक्टर – सुपर मीटर कंपनी . अध्यक्ष – राजलक्ष्मी फांउडेशन . इत्यादी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा पार पडला .

सरपंच सौ. जनाबाई काकडे यांनी ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने गावातील केलेल्या विकास कामाबद्दल हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे .

 

यावेळी उपस्थित ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर पांचाळ , पोपटराव काकडे , पवन सरवदे , आदर्श शिक्षक नरहरी काकडे , दादा परळकर , तानाजी आंडिल , श्रीमती पुजा पांचाळ , श्रीमती प्रिती सरवदे इत्यादी सहकारी पुरस्कार स्विकारते वेळी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!