केज दि ४(प्रतिनिधी)
तालुक्यातील बोरीसावरगाव येथे सत्यमेव जयते फार्मर कप स्नेह मेळावा मंगळवार रोजी संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच वैजनाथ देशमुख, प्रमुख मार्गदर्शक पानी फाउंडेशनचे मराठवाडा समन्वयक संतोष शिनगारे,प्रमुख उपस्थिती उपसरपंच बाळासाहेब यादव, डॉ हनुमंत सौदागर आदींची होती. सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेत
तालुक्यातून उत्कृष्ट काम करणाऱ्या शेतकरी गटांचा उपस्थितांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना संतोष शिनगारे म्हणाले ज्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला.ते सर्वच गट जिंकलेलो आहात.
सर्व गटांचा उत्साह यांच्या चेहऱ्यावर विजय दाखवत आहे असे मत व्यक्त केले.
सेंद्रिय आणि विषमुक्त अन्न ही काळाची गरज असल्याचे मत डॉ सौदागर यांनी व्यक्त केले.
स्नेह मेळाव्यासाठी बहिणाबाई महिला शेतकरी गट दिपेवडगाव,राजमाता जिजाऊ महिला शेतकरी गट लाडेगाव,संघर्ष महिला शेतकरी गट लाडेगाव, ज्ञानेश्वरी महिला शेतकरी गट लाडेगाव, आदिशक्ती महिला शेतकरी गट चंदनसावरगाव
,भुमिपुत्र शेतकरी गट चंदन सावरगाव ,कृषीसखी महिला शेतकरी गट चंदन सावरगाव जय किसान महिला शेतकरी गट कानडी बदन ,जय किसान पुरुष शेतकरी गट कानडी बदन, दत्तकृपा महिला शेतकरी गट , हिरकणी महिला शेतकरी गट आडस, माऊली शेतकरी गट आडस, उत्तरेश्वर महिला शेतकरी गट हनुमंत पिंपरी
सावित्रीबाई फुले महिला शेतकरी गट
बोरीसावरगाव, शंभु महादेव शेतकरी गट बोरीसावरगाव
,तृण अंकुर शेतकरी गट पाथरा आदी शेतकरी गटांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी गटातील शेतकऱ्यांना आलेले सुंदर अनुभव कथन करण्यात आले.
महिला शेतकरी गटांनी उत्स्फूर्तपणे अनुभव कथन करताना शेतीत आनंदाने काम केले असल्याचे अनुभव सांगितले.
उत्पादन वाढले हेच सर्वात मोठे बक्षीस असल्याचे प्रतिक्रिया गट सदस्यांनी दिल्या. पानी फाउंडेशनचे
नितीन पाटोळे,सिद्धार्थ गवळे,महेश गूळभिले उपस्थित होते
कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रशिक्षक विनोद ठोंबरे, तालुका समन्वयक हरिश्चंद्र पांचाळ यांनी परिश्रम घेतले
कार्यक्रमास गटातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते
सोबत फोटो









Leave a Reply