*केज येथे सद्भावना यात्रेच्या नियोजनाची बैठक संपन्न.* *”सर्वांनी याञेत सहभागी व्हावे – राहुल सोनवणे.*

 

 

 

केज/प्रतिनिधी

 

बीड जिल्ह्यातील वाढत चाललेली जातीय दरी कमी करण्यासाठी व राज्यात देखील वाढत असलेला जातीयवाद संपुष्टात यावा या उद्देशाने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सद्भावना यात्रा काढण्याचे जाहीर केले व ही यात्रा बीड जिल्ह्यातून सुरुवात होत असून दि.८ मार्च रोजी मस्साजोग पासून बीड पर्यंत ही पदयात्रा जाणार असून याच्या नियोजनासाठी नुकतीच केज येथे शिवनेरी बंगल्यावर मराठवाड्यातील काँग्रेस पदाधिकारी यांची बैठक पार पडली.

 

या बैठकीला प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी,माजी मंत्री अशोक पाटील,देविदास भन्साळी,राजेंद्र राख,अमर खानापुरे,जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल सोनवणे यांच्यासह मराठवाड्यातील प्रदेश पदाधिकारी,जिल्हाध्यक्ष यांची नियोजनासाठी संयुक्त बैठक संपन्न झाली. या बैठकीत प्रत्येकांनी आपले विचार मांडले यातून बिघडत चाललेला सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्याचे आवाहन असून केवळ काँग्रेस पक्षच नव्हे तर ही सर्वांचीच जबाबदारी असल्याचे यावेळी सर्वांनी मत व्यक्त केले.ही यात्रा दि.८ मार्च रोजी सकाळी ८ वाजता मस्साजोग येथून स्व.संतोष अण्णा देशमुख यांच्या प्रतिमेला आदरांजली अर्पण करून सुरू होणार आहे तर पुढे येळंबघाट,नेकनुर येथे मुक्काम,दि.९ रोजी सकाळी ७ वाजतादुसऱ्या दिवसाची सुरुवात नेकनुर येथून होऊन मांजरसुंभा,पाली मार्गे बीड येथे जाणार असून बीड मध्ये यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात ६ वाजता या पदयात्रेचा समारोप होणार असून या दोन्ही दिवसाच्या पदयात्रेत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे स्वतः उपस्थित राहणार आहेत त्याच बरोबर प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष यांच्यासह बीड जिल्ह्यातील सर्व जाती धर्मातील नागरिकांनी या सद्भावना यात्रेत उपस्थित राहून सामाजिक सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन यावेळी करण्यात आले. या पदयात्रेत सर्व समाजाचे नागरिक यांनी सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी सर्वांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!