केज!प्रतिनिधी
तालुक्यातील श्रीक्षेत्र संत तुकोबाराय पावनधाम संस्थान येथे संत तुकाराम महाराज बीजोत्सवाच्या सोहळ्यात तिसऱ्या दिवशी ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदीचे प्रमुख विश्वस्त,योगी निरंजननाथ महाराज यांची प्रवचन सेवा संपन्न झाली.यावेळी उपस्थित भाविकांना ज्ञानामृत वाटताना योगी निरंजननाथ महाराज म्हणाले की,बोराडे शास्त्रींनी त्यागाच्या बळावर देहूचे तुकोबा माळरानावर आणून भक्तीचा मळा फुलविला आहे. प्रवचनात पुढे बोलताना ते म्हणाले की, समाधान,सुख हे फक्त पांडुरंगाच्या भक्तीत आहे. माऊलींनी दिलेला ‘रामकृष्ण हरी’ हा मंत्र जपत रहा, आयुष्यात कांही कमी पडणार नाही.ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदीचे प्रमुख विश्वस्त,योगी निरंजनाथ महाराज यांचे प्रवचन ऐकण्यासाठी शेकडो भाविक संत तुकोबाराय पावनधाम संस्थान येथे आले होते.आलेल्या भाविकांची गैरसोय होणार नाही याची काळजी संत तुकोबाराय पावनधाम संस्थानचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प.महादेव महाराज बोराडे शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंसेवकांनी घेतली.









Leave a Reply