*पिसेगाव जानेगाव रस्त्याचे काम लवकर पुर्ण करावे.* *अॅड.निखिल बचुटे यांची तहसीलदारांमार्फत पालकमंञ्याकडे मागणी*

 

केज:प्रतिनिधी

केज तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग ५४८ ते पिसेगाव जानेगाव या रस्त्याचे काम गेले अनेक दिवस अतिशय विलंबाने चालु आहे त्यामुळे नागरिकांना मोठा ञास सहन करावा लागतोय,जर पावसाळा सुरू होईपर्यंत या रस्त्याचे काम पुर्ण नाही झाले तर पावसाळ्यात या रस्त्यावरून येणे जाणे सुद्धा करता येणार नाही व या रस्ता कामामुळे बससेवा सुद्धा बंद असुन विद्यार्थांची व जेष्ठ नागरिकांचीही येण्या जाण्याची गैरसोय होत आहे म्हणुन येत्या पावसाळा सुरू होण्यापुर्वी या रस्त्याचे काम पुर्ण करावे अशा सुचना संबधित रस्ता बनवणाऱ्या कंपनीला कराव्यात अशी मागणी निखिल बचुटे यांनी तहसीलदारांमार्फत बीडचे पालकमंञी अजितदादा पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!