*एम.टी.एस. परीक्षेत कु. प्रीशा रोकडे राज्यात द्वितीय*

 

 

केज (प्रतिनिधी) तालुक्यातील बनसारोळा येथील रहिवासी रामहरी धोंडीराम रोकडे यांची नात कु. प्रीशा महेश रोकडे हिने एम. टी. एस. या स्पर्धा परीक्षेत राज्यातून दुसरा येण्याचा मान पटकावला आहे. कु. प्रीशा महेश रोकडे हि

अंबाजोगाई येथील योगेश्वरी नूतन प्राथमिक विद्यालयाची वर्ग दुसरीची विद्यार्थिनी‌ आहे .

एम.टी.एस.परीक्षेत राज्यातून दुसरी आलेली प्रीशा महेश रोकडे हिने 150 पैकी 146 गुण मिळवत राज्यातून दुसरा क्रमांक पटकावला आहे. कु.प्रीशा रोकडे ही महाराष्ट्र विद्यालय मोहा येथील आदर्श शिक्षक महेश रामहरी रोकडे यांची मुलगी आहे. तिला आई वर्षा रोकडे, वडील महेश रोकडे, आजोबा रामहरी रोकडे आणि योगेश्वरी नूतन विद्यालयातील शिक्षकांचे उत्तम असे मार्गदर्शन लाभले.

कु. प्रीशा महेश रोकडे हिने मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल पुष्पगुच्छ देऊन आणि पेढा भरवून सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी सेवानिवृत्त पेशकार रामहरी रोकडे, संतोष रोकडे, महेश रोकडे, वर्षा रोकडे, मीना रोकडे ,साधना रोकडे यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!