*राजर्षी शाहू विद्या मंदिर शाळेत बक्षीस वितरण व निरोप समारंभाचा कार्यक्रम संपन्न.*

 

 

केज ! सुमित मोरे

 

“अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती”

 

.केज शहरातील स्वामी दयानंद प्रतिष्ठान केज संचलित राजर्षी शाहू विद्या मंदिर प्राथमिक शाळेत इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला तसेच सांस्कृतिक कार्यक्रमातील सहभाग व विविध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचे बक्षीस वितरण करण्यात आले.निरोप समारंभाचे आयोजन इयत्ता सहावीतील विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापिका चाटे बी.बी.यांच्या नियोजनानुसार शिक्षकांच्या मदतीने केले होते.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती चाटे बी.बी. तर प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी दयानंद प्रतिष्ठान केजचे सहसचिव तथा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.अशोकराव डांगे तर प्रमुख उपस्थितीमध्ये शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्री.यादव व्ही. बी.यांची उपस्थिती होती.

प्रारंभी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला.वार्षिक स्नेह संमेलनामध्ये सहभागी सर्व विद्यार्थ्यांना तसेच शाळेतील विविध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना यावेळी बक्षीसाचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रम प्रसंगी सातवीच्या अनेक विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त करताना शाळेत आलेले अनुभव खूप आत्मीयतेने सांगितले व शाळेतील शिक्षकांचे ऋण व्यक्त केले.त्यांनी दिलेली शिक्षणाची ही प्राथमिक शिदोरी आमच्या उर्वरित आयुष्याचा भक्कम पाया असल्याचे याप्रसंगी नमूद केले.यावेळी कु. अनुजा तिडके,कु. ज्ञानेश्वरी खाडे व कु. गार्गी क्षीरसागर यांनी आपले शाळेतील अनुभव सांगितले व आठवणींना उजाळा दिला.

विद्यार्थ्यांना बोलताना श्री. यादव म्हणाले म्हणाले चांगली व्यक्ती म्हणून जीवन जीवन जगा,आपले ध्येय निश्चित करा.जे क्षेत्र निवडाल त्यात निपुण व्हा.श्रीमती अनिता जाधव यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना आपले ध्येय निश्चित करून ते मिळवण्यासाठी प्रयत्नरत राहा असे सांगत भावी आयुष्यासाठी मनभरुन शुभेच्छा दिल्या.प्रमुख पाहुणे श्री. डांगे यांनी यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करत त्यांचे कौतुक केले व जीवनातील प्रत्येक संकटाचा सामना धैर्याने करा व आपल्या यशस्वी जीवनातून शाळा पालक व देशासाठी अभिमानास्पद कामगिरी करा असे सांगितले.परिसरातील यशस्वी विद्यार्थ्यांची उदाहरणे देत यशाचे गमक विद्यार्थ्यांना सांगितले.

अध्यक्षीय समारोपात श्रीमती चाटे बी.बी. यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे व सांस्कृतिक कार्यक्रतील सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या यश मिळविण्यासाठी अभ्यासातील सातत्य,जिद्द चिकाटी गरजेची आहे.

कार्यक्रमाच्या शेवटी सातवीच्या विद्यार्थ्यांनी शाळेला आठवण म्हणून भेटवस्तू दिली व अल्पोपहारानंतर ओल्या डोळ्यांनी कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री.क्षीरसागर आर.एस.यांनी केले तर आभार श्री. देशमुख ए. डी.यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री.डिरंगे जी.बी,श्री. मस्के जे. आर. व श्रीमती ध्वजा गायकवाड या शिक्षक वृंदांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!