केज । प्रतिनिधी
शिक्षण क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या शाम ज्युनियर कॉलेज, दहिफळ (वड) ने यंदाही आपल्या यशाची परंपरा कायम ठेवली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या बारावीच्या परीक्षेच्या निकालात कॉलेजने १००% निकालाची घवघवीत कामगिरी केली आहे.
या यशामागे विद्यार्थ्यांचे अथक परिश्रम, पालकांचे सहकार्य आणि शिक्षकवृंदाचे समर्पित मार्गदर्शन आहे. विज्ञान, कला शाखेतील सर्वच विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली असून, अनेकांनी ‘पहिल्या श्रेणीत’ उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला आहे. विज्ञान शाखेचा १००% निकाल लागला असुन कला शाखेचा ९६% निकाल लागला आहे पैकी विज्ञान शाखेतून कु. शिंदे सृष्ठी शरद हिने ९३ % घेत प्रथम तर कु. नागरगोजे श्वेता रामदास हिने ९२% घेत द्वितीय व कु. आंधळे पायल ज्ञानोबा हिने ९१% घेत तृतीय क्रमांक मिळवला आहे .तसेच कला शाखेतून जगताप आर्यन दत्तात्रय याने ८२% घेत प्रथम तर वाघमारे सागर रविंद्र याने ८१% घेत व्दितीय व ढाकने सुनील नामदेव याने ७९% घेत तृतीय क्रमांक पटकावला आहे. या यशाबद्दल संस्थेचे सचिव इंजि.शरद गदळे, अध्यक्ष डॉ. शशिकांत दहिफळकर व कोषाध्यक्ष डॉ. शालीनी कराड (गदळे ) तसेच कॉलेजचे प्राचार्य श्रीम.जयश्री शरद गदळे ( इप्पर ) उपप्राचार्य गंदगे आर.व्हि. सर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत प्राचार्य श्रीम. जयश्री शरद गदळे यांनी शिक्षकांचे अभिनंदन करताना सांगितले की, ” कॉलेजचे उद्दिष्ट गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन विद्यार्थ्यांना उज्वल भविष्याची दिशा देणे हेच आहे.” गावकऱ्यांनीही या यशाचा आनंद व्यक्त करत कॉलेजच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.









Leave a Reply