*सोनिजवळा येथील जलजिवन मिशन योजनेच्या विरोधातले आत्मदहन आंदोलन लेखी आश्वासना नंतर तात्पुरत्या स्वरूपात स्थगित*  *प्रशासनाने आश्वासन दिल्याप्रमाणे दखल न घेतल्यास यापुढे उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडणार-दशरथ चवरे* 

 

केज/प्रतिनिधी

 

केज तालुक्यातील सोनिजवळा येथील जलजिवन मिशन योजनेच्या कामात अनियमितता करुन गावकऱ्यांची व शासनाची आर्थिक फसवणूक केली असे लेखी निवेदनाद्वारे तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार दशरथ चवरे यांनी केली होती.

जर प्रशासनाने दशरथ चवरे यांच्या तक्रारीची दखल न घेतल्यास दिनांक ७ जुलै २०२५ रोजी सोनीजवळा येथील पाण्याच्या टाकीवर चढुन आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.

दिनांक १९ मार्च २०२५ रोजी दशरथ चवरे यांनी तक्रारी अर्ज दिला होता परंतु संबंधित कार्यालयाकडून सदर तक्रारी अर्जाची दखल न घेतल्याने दिनांक २ एप्रिल २०२५ रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर दशरथ चवरे यांनी आमरण उपोषण केले होते. दशरथ चवरे हे उपोषणाला बसले असता त्यांच्या उपोषणाची दखल घेऊन सदर कामाची कामाची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली व दिनांक १५ एप्रिल २०२५ रोजी चौकशी समिती प्रत्यक्षात चौकशी साठी गावात गेली परंतु सदर चौकशी समिती मध्ये ज्या अधिकारी, कर्मचारी यांच्यावर आरोप करण्यात आले होते तेच कर्मचारी या चौकशी समिती मध्ये होते‌.

सदरील तक्रारीच्या अनुषंगाने कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा यांनी चौकशी समिती गठीत करुन पंधरा दिवसांच्या आत चौकशी करून अहवाल हा वरिष्ठ कार्यालयास व वरिष्ठांच्या परस्पर संबंधित तक्रारदारास देण्यास सांगितले होते.

ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागाच्या श्रीमती साळवे मॅडम या संबंधीत गुत्तेदार व वापसको कंपणीला पाठीशी घालण्याचे काम करत आहेत तक्रारदाराने वेळोवेळी चौकशी अहवाल व केलेल्या पंचनामेची प्रत मागुन देखील अद्याप पर्यंत संबंधित चौकशीचा अहवाल पंचनामा प्रमाणे व सदरचा पंचनामा करतेवेळी तक्रारदाराचे कसलेही म्हणणे ऐकुन न घेताच पंचनामा गुत्तेदाराच्या बाजूने एकतर्फे तयार केला होता परंतु सदर पंचनामा व पंचनामे अनुसार तयार केलेला अहवाल अद्याप पर्यंत दिलेला नाही म्हणून संबंधित दोषी कर्मचारी,उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, आणि वापसको‌ कंपनीचे तालुका समन्वयक व संबंधित गुत्तेदार यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अन्यथा ७ जुलै २०२५ रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्या अनुसार दशरथ चवरे यांनी सोनी जवळा येथील पाण्याच्या टाकीवर चढून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला असता भ्रमणध्वनी वरून जलजीवन मिशनचे वरिष्ठ अधिकारी यांनी दशरथ चवरे यांच्याशी संपर्क साधून त्यांना विनंती करून त्यांच्या तक्रारीची दखल घेण्याचे व संबंधित दोषीवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर व सहाय्यक गट विकास अधिकारी अभिमान राठोड, युसुफ वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मच्छिंद्र शेंडगे, पत्रकार बांधव आणि ग्रामस्थांच्या विनंती वरून व ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग केज च्या उपअभियंता श्रीमती साळवे मॅडम यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आले. माध्यमांशी बोलताना दशरथ चवरे म्हणाले की, प्रशासनाने मला दिलेल्या लेखी आश्वासनाप्रमाणे माझ्या तक्रारीची दखल न घेतल्यास यापुढे मी व ग्रामस्थ मिळून आम्ही उग्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचा प्रशासनाला इशारा दिला आहे.

यावेळी साहाय्यक गटविकास अधिकारी अभिमान राठोड साहेब,युसुफ वडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्र शेंडगे साहेब, अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक मिनाज पटेल, दादासाहेब ससाणे व पत्रकार बांधव आणि समस्त गावकरी यांच्या मध्यस्थीने आंदोलन मागे घेण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!