*ग्राम स्वछतेसाठी समाजसेवक नरहरी काकडे यांनी स्वतः केली तणनाशक फवारणी.*

 

 

केज!सुमित मोरे

 

केज तालुक्यातील साबला या गावात ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने तननाशक औषधांची फवारणी करण्यात आली . सरपंच जनाबाई नरहरी काकडे , उपसरपंच कचराबाई राजेंद्र सरवदे , ग्रामपंचायत अधिकारी शिंपले तानाजी आश्रुबा यांच्या मार्गदर्शनाखाली .

साबला या गावात नेहमीच ग्रामस्वच्छता मोहीम राबविण्यात येत असून याचे कारण म्हणजे गावात रोगराई पसरु नये तसेच गावातील वातावरण स्वच्छ रहावे यासाठी सरपंच नेहमीच प्रयत्नशील असतात स्वच्छ गाव , सुंदर गाव, तसेच झाडे लावा झाडे जगवा , पाणी अडवा पाणी जिरवा या नुसार साबला गावातील ग्रामपंचायत मार्फत ग्रामस्वच्छतेकडे अगदी वेळच्या वेळी दक्षता घेवून काळजी घेतली जाते.

साबला गावात तननाशक औषधांची फवारणी समाजसेवक नरहरी काकडे , ग्रामपंचायत सदस्य माऊली पांचाळ , ग्रामपंचायत कर्मचारी गुलाब मुळे , विश्वनाथ नाईकनवरे , तसेच बाबासाहेब काकडे , रामराजे काकडे , विकास सरवदे , लक्ष्मण कटारे या वेळी इत्यादींची उपस्थिती होती .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!