भावी जि.प. सदस्य म्हणून राहूल भैय्या सोनवणे यांच्या नावाची सोशल मिडीयावर चर्चा सुरु. जि.प. सदस्य म्हणून राहुल सोनावणेंच्या नावाची सोशल मीडियात झाली चर्चा सुरू केज / प्रतिनिधी खासदार रजनीताई पाटील व माजी मंत्री अशोक दादा पाटील यांचे खंदे समर्थक तथा काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे हे भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून सोशल मीडियामधे सध्या चर्चेत आहेत. त्यांच्या चाहत्यांनी व कार्यकर्त्यांनी मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, मागील काही दिवसापूर्वी जिल्हा परिषद व पंचायत समिती गट गणाची रचना झालेली आहे‌. ‌सध्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक रणसंग्राम सुरू झाला असून गण व गटाची रचना जाहीर होताच अनेकांची तयरी सुरू झाली असल्याचे पहायला मिळत आहे तर काही इच्छुकांच्या नावाची चर्चा पब्लिक मधून देखील सुरू झाली आहे त्यामध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे यांच्या नावाची भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून सोशल मीडियावर पोस्ट वायरल होत आहेत. त्यांचे हितचिंतक व कार्यकर्ते त्यांच्या पुर्वतयारीला लागलेले पहायला मिळत आहे. खासदार रजनीताई पाटील व माजी मंत्री अशोक दादा पाटील यांचे खास विश्वासू म्हणून राहुल सोनवणे यांची ओळख आहे त्यांना युसुफ वडगाव सर्कलमध्ये मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. ग्रामीण भागातील मिनी मंत्रालय म्हणून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कडे पाहिले जाते. अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आता अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या निवडणुकांचा मुहूर्त साधला जात आहे. त्याच अनुषंगाने जिल्हा परिषद पंचायत समितीच्या गट व गणाची रचना देखील प्रशासकीय पातळीवर नुकतीच जाहीर झाली आहे आणि लवकरच संबंधित ठिकाणी आरक्षण देखील जाहीर होतील मात्र सर्कलची रचना जाहीर होताच इच्छुक आणि त्या भागातील काही कर्तबगार कार्यकर्त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. केज तालुक्यातील युसुफ वडगाव जिल्हा परिषद सर्कलमधे सामाजिक,धार्मिक,राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील एक झुंजार नेतृत्व म्हणून राहुल सोनवणे यांच्या नावाची सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चा होताना दिसत आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती गट गणाचे आरक्षणाची सोडत झाल्यानंतरच पुढील चित्र स्पष्ट होईल परंतु सध्या तरी युवकांचे नेते राहुल भैय्या सोनवणे हे या सर्कलमध्ये चांगलेच चर्चेत आलेले पहायला मिळत आहेत.

भावी जि.प. सदस्य म्हणून राहुल भैय्या सोनावणें यांच्या नावाची सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरू.

केज! प्रतिनिधी

खासदार रजनीताई पाटील व माजी मंत्री अशोक दादा पाटील यांचे खंदे समर्थक तथा काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे हे भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून सोशल मीडियामधे सध्या चर्चेत आहेत. त्यांच्या चाहत्यांनी व कार्यकर्त्यांनी मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मागील काही दिवसापूर्वी जिल्हा परिषद व पंचायत समिती गट गणाची रचना झालेली आहे‌.

‌सध्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक रणसंग्राम सुरू झाला असून गण व गटाची रचना जाहीर होताच अनेकांची तयरी सुरू झाली असल्याचे पहायला मिळत आहे तर काही इच्छुकांच्या नावाची चर्चा जनतेतून देखील सुरू झाली आहे त्यामध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल भैय्या सोनवणे यांच्या नावाची भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून सोशल मीडियावर पोस्ट वायरल होत आहेत. त्यांचे हितचिंतक व कार्यकर्ते त्यांच्या पुर्वतयारीला लागलेले पहायला मिळत आहेत. खासदार रजनीताई पाटील व माजी मंत्री अशोक दादा पाटील यांचे खास विश्वासू म्हणून राहुल सोनवणे यांची ओळख आहे त्यांना युसुफ वडगाव सर्कलमध्ये मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे.
ग्रामीण भागातील मिनी मंत्रालय म्हणून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कडे पाहिले जाते. अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आता अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या निवडणुकांचा मुहूर्त साधला जात आहे. त्याच अनुषंगाने जिल्हा परिषद पंचायत समितीच्या गट व गणाची रचना देखील प्रशासकीय पातळीवर नुकतीच जाहीर झाली आहे आणि लवकरच संबंधित ठिकाणी आरक्षण देखील जाहीर होतील मात्र सर्कलची रचना जाहीर होताच इच्छुक आणि त्या भागातील काही कर्तबगार कार्यकर्त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. केज तालुक्यातील युसुफ वडगाव जिल्हा परिषद सर्कलमधे सामाजिक,धार्मिक,राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील एक झुंजार नेतृत्व म्हणून राहुल सोनवणे यांच्या नावाची सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चा होताना दिसत आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती गट गणाचे आरक्षणाची सोडत झाल्यानंतरच पुढील चित्र स्पष्ट होईल परंतु सध्या तरी युवकांचे नेते राहुल भैय्या सोनवणे हे या सर्कलमध्ये चांगलेच चर्चेत आलेले पहायला मिळत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!