भावी जि.प. सदस्य म्हणून राहुल भैय्या सोनावणें यांच्या नावाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा.
केज! प्रतिनिधी
मा.खासदार रजनीताई पाटील व माजी मंत्री अशोक दादा पाटील यांचे खास विश्वासू, खंदे समर्थक तथा राष्ट्रीय काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष राहुल भैय्या सोनवणे हे भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून सोशल मीडियामधे सध्या जोरदार चर्चेत आहेत. त्यांच्या चाहत्यांनी व कार्यकर्त्यांनी मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर अगदी धुमाकूळ घातला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मागील काही दिवसापूर्वी जिल्हा परिषद व पंचायत समिती गट आणि गणाची रचना झालेली आहे.
सध्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीचा रणसंग्राम सुरू झाला असून गण व गटाची रचना जाहीर होताच अनेकांची तयारी सुरू झाली असल्याचे पहायला मिळत आहे, तर काही इच्छुकांच्या नावाची चर्चा जनतेमधून देखील सुरू झाली आहे त्यामध्ये राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल भैय्या सोनवणे यांच्या नावाची युसुफ वडगाव सर्कल मधून भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून सोशल मीडियावर पोस्ट वायरल होत आहेत. त्यांचे हितचिंतक व कार्यकर्ते निवडणुकिच्या पुर्वतयारीला लागलेले पहायला मिळत आहे. मा.खासदार रजनीताई पाटील व माजी मंत्री अशोक दादा पाटील यांचे खास विश्वासू म्हणून राहुल भैय्या सोनवणे यांची संपूर्ण जिल्हयात ओळख आहे त्यांना युसुफ वडगाव सर्कलमध्ये मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे.
ग्रामीण भागातील मिनी मंत्रालय म्हणून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कडे पाहिले जाते. अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आता अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या निवडणुकांचा मुहूर्त साधला जात आहे. त्याच अनुषंगाने जिल्हा परिषद पंचायत समितीच्या गट व गणाची रचना देखील प्रशासकीय पातळीवर नुकतीच जाहीर झाली आहे आणि लवकरच संबंधित ठिकाणी आरक्षण देखील जाहीर होतील मात्र सर्कलची रचना जाहीर होताच इच्छुक आणि त्या भागातील काही कर्तबगार कार्यकर्त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. केज तालुक्यातील युसुफ वडगाव जिल्हा परिषद सर्कलमधे सामाजिक,धार्मिक,राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील एक तरुण, तडफदार, झुंजार नेतृत्व म्हणून राहुल भैय्या सोनवणे यांच्या नावाची सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार चर्चा होताना दिसत आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती गट गणाचे आरक्षणाची सोडत झाल्यानंतरच पुढील चित्र स्पष्ट होईल परंतु सध्या तरी तरूण, तडफदार,युवकांचे नेते राहुल भैय्या सोनवणे हे या सर्कलमध्ये जजोरदार चर्चेत आलेले पहायला मिळत आहेत.









Leave a Reply