महालक्ष्मीला(गौरीला) जन्म देणारं सोनेसांगवी गाव (केजच्या आकर्षक मुखवट्यांना महाराष्ट्राभरातून मागणी)

 

केज दि २७(प्रतिनिधी)
तालुक्यातील सोनेसांगवी हे १९८० साली मांजरा प्रकल्पामुळे पुनर्वशीत झालेले गाव. अडीचशे कुटुंब, गावाची तेराशे लोकसंख्या असलेले गाव. त्यावेळी गावात रोजगार अत्यल्प प्रमाणात उपलब्ध असे.गावातील दहा ते अकरा कुटुंब पारंपारिक गाडगे तयार करण्याचा व्यवसाय करत.जेष्ठ कारागीर माणिक इटकर संधी ओळखून लक्ष्मी मुखवटे, गणेश मूर्ती, बैल खेळणी तयार करण्यास सुरुवात केली. कलाकुसर शिकून गुणवत्तापूर्ण सुंदर मुखवटे तयार करण्यास अनेक कुटुंब पुढं आली. लक्ष्मीचे मुखवटेची आता प्रचंड मागणी वाढली आहे. सोनेसांगवी हे महाराष्ट्रातील अनेक भागात महालक्ष्मी मुखवट्यांचा पुरवठा करत आहेत महालक्ष्मी यांना जन्म देणाऱ्या गाव म्हणून सोने सांगवीकरांची ओळख होत झाली आहे.बाजारपेठेत या मूर्तींना मोठी मागणी आहे.

८० च्या दशकानंतर शेती व अन्य मजुरीची कामे मिळत नव्हती या काळात संधी ओलखली आणि अनेक कुटुंबाने या व्यवसायात कौशल्य विकसित केले. गुणवत्ता निर्माण केली. आज या कुटुंबांना रोजगार उपलब्ध झाला. दरवर्षी मोठ्या प्रमाणात यामधून नफा मिळत आहे.
१० ते ११ कुटुंब ५५ ते ६० कुटुंबीय यांना आता या व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळत आहे

 

 

——चौकट ——-
महिलांना रोजगार

लक्ष्मी निर्मितीच्या उद्योगातून महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत पूर्ण वेळ मूर्ती तयार करण्याचे काम सुरू असते या व्यवसायामुळे आता महिला सक्षम होत आहेत.

—————- चौकट—

मी बीड आयटीआय कॉलेजमध्ये व्यवसायीक प्रशिक्षण घेत आहे. सुट्टीच्या कालावधीमध्ये आई-वडिलांना व्यवसायामध्ये मदत करतो.
रंगरंगोटी करणे ,पॅकिंग करणे इत्यादी कामे करतो.

ओंकार इटकर,
सिद्धेश्वर इटकर
आय टी आय विद्यार्थी

————————

कर्ज मिळायला हवे

या व्यवसायामध्ये वाढ होण्याकरिता विश्वकर्मा योजना किंवा अन्य योजनेमधून अशा कुटुंबीयांना कर्ज मिळायला हवे ज्यामुळे केवळ कौशल्य विकास वर खर्च होणारा पैसा या व्यवसायिकांच्या काम येईल

——–चौकट—–
सोलापूर जिल्ह्यातून मोठी मागणी
शाडू माती प्लास्टर ऑफ पॅरिस पॅरिस पासून आम्ही तयार केलेल्या सुंदर आकर्षक महालक्ष्मीच्या मुखवट्यांना सोलापूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात मागणी आहे बार्शी येथील व्यापारी आमच्याकडे अगोदर बुकिंग करून नंतर मुखवटे घेऊन जातात.

कारागीर
बळीराम त्रिम्बक इटकर

—————–

कामातून आनंद मिळतो.
आम्ही महालक्ष्मी बनवण्याचे काम करत असल्यामुळे आता आमच्या हाताला रोजगार मिळाला आहे शेतात अथवा इतर ठिकाणी मजुरीला जाण्याची गरज पडत नाही. या कामातून आनंदही मिळतो

अनिता इटकर
————–

हातात लक्ष्मी नांदते

आमच्या पिढ्यान पिढ्या चालत आलेली पारंपारिकता
आम्ही टिकवली आहे.
यामध्ये काही बदल करून लक्ष्मीचे मुखवटे, लहान मुखवटे ,कापडी हात बनवणे,गणेश मूर्ती,खेळणी असे बदल केले आहेत.
या व्यवसायामुळे आमच्या हाती पैसा येऊन आमच्याही घरात लक्ष्मी नांदते आहे.

कारागीर तथा माजी सरपंच सोनेसांगवी
माणिकराव संतराम इटकर

————

आम्ही सुरुवातीला कलाकुसरीतून छोट्या मूर्ती बनवू लागलो. रोप लावले आणि आज बाजारपेठेमध्ये सर्वाधिक मागणी असणार आमचं गाव अशी ओळख झाली आहे.

गयाबाई इटकर

———-चौकट—
ग्रामीण भागातील सुरू असलेल्या या व्यवसायाला शासन दरबारी प्रोत्साहन देऊन चालना मिळायला हवी
असे कारागीर बबन दिगंबर इटकर,
नितीन बबन इटकर,
धोंडीराम विश्वनाथ इटकर,नामदेव इटकर,आश्रूबा इटकर
यांनी सांगितले.

सोबत फोटो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!