केज दि ५(प्रतिनिधी)
केज शहरातील केजचा महाराजा गुंड गल्ली गणेश मंडळाच्या कडून शुक्रवार रोजी विज्ञान प्रदर्शन स्पर्धा, रक्तदान शिबीर व चित्रकला स्पर्धा अशा विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. या विज्ञान प्रदर्शन स्पर्धेचे उद्घाटन केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना ते म्हणाले अशा विज्ञान प्रदर्शनातून
वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होते विद्यार्थ्यांना संधी मिळते आणि यातून नवीन संशोधक तयार होतील असे मत स्वप्नील उनवणे व्यक्त केले.
विज्ञान प्रदर्शन स्पर्धेत
प्रथम क्रमांक बेडसकर शिवम सुग्रीव ,द्वितीय सिद्धी शैलेश लोंढे,
तृतीय कृष्णा ज्ञानेश्वर इंगळे
रोहित कैलास नेहरकर यांनी पारितोषिक पटकावले. चित्रकला स्पर्धा
लहाना गट १ ली ते ७ वी
प्रथम दिव्या संजय कराड ,
द्वितीय कदम अनुष्का मनोज ,तृतीय श्रावणी संतोष लोंढे तर
मोठा गट ८ वी ते खुला गट
प्रथम हर्षदा उदय सिरसट,
द्वितीय प्रणिती प्रशांत कोकीळ याने क्रमांक मिळवला.
विज्ञान प्रदर्शन स्पर्धेत परिसरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या नाविन्यपूर्ण मॉडेल्सला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. स्पर्धेचे परीक्षण हनुमंत भोसले, बाळासाहेब तिडके आणि डॉ. हनुमंत सौदागर यांनी केले. विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
समाजोपयोगी दृष्टिकोनातून मंडळाने रक्तदान शिबिराचे आयोजनही केले. स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय, आंबेजोगाई येथील वैद्यकीय पथकाने रक्तसंकलनाची जबाबदारी सांभाळली. अनेक तरुणांनी उत्साहाने रक्तदान करून सामाजिक जबाबदारी पार पाडली.
चित्रकला स्पर्धेमध्ये लहान मुलांनी गणेशोत्सव, स्वच्छता, विज्ञान व पर्यावरण या विषयांवर आकर्षक चित्रे रेखाटली. मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे व सृजनशीलतेला चालना मिळावी यासाठी उपक्रम ठेवण्यात आले
विज्ञान प्रदर्शन,चित्रकला स्पर्धा, रक्तदान शिबीर, मिनी सर्कस,ऑपरेशन सिंदूर थीम, स्वराज्याचा गणराया छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडावरील गणपती असा देखावा तयार करण्यात आला होता.
उपक्रम यशस्वीतेसाठी गणेश मंडळाचे अध्यक्ष राहुल गुंड,उपाध्यक्ष मयुर कदम,सचिव आदित्य गुंड, अभिजीत नाईकवाडे, विशाल गुंड,महेश गुंड, सदाशिव गुंड, आदित्य राऊत,ऋषी कांबळे, ज्ञानेश्वर गुंड, सुमित गुंड, रोहित गुंड यांसह
महाराजा गणेश मंडळाचे कार्यकर्त्यांनी या सर्व कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करून सहभागी विद्यार्थी, परीक्षक व रक्तदात्यांचा सत्कार केला. धार्मिक सोहळ्यासोबत सामाजिक बांधिलकी जोपासत मंडळाने केलेल्या या उपक्रमांचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.
सोबत फोटो









Leave a Reply