खा. बजरंग सोनवणे यांचे खंदे समर्थक, गोविंद ससाणे यांचा उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत ग्राम पंचायत सदस्यांसह आडसकर गटात जाहिर प्रवेश.
केज! प्रतिनिधी
खा. बजरंग सोनवणे यांचे खंदे समर्थक सोनीजवळा गावचे सरपंच गोविंद ससाणे यांनी त्यांच्या सहकार्यासह अजित पवार ( राष्ट्रवादी ) गटात जाहिर प्रवेश केला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजित (दादा) पवार यांच्या उपस्थितीत व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जेष्ठ नेते मा. रमेशराव आडसकर यांच्या नेतृत्वा खाली सोनी जवळा गावचे सरपंच गोविंद ससाणे, यांनी त्यांचे सहकार्य सह राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये रमेश आडसकर साहेबांचे नेतृत्वा खाली जाहीर प्रवेश केला आहे यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना सोनी जवळा गावचे सरपंच, गोविंद ससाणे यांनी सांगितले कि मी पुर्वी खा. बजरंग बप्पा सोनवणे यांच्या नेतृत्वा खाली अतिशय इमानदारी ने काम केले परंतु खासदारांच्या जवळच्या, बडव्यांनी माझ्या विरोधात काम केले, प्रसंगी कांहीनी माझ्या विषयी अपशब्द वापरले, मी गावचा सरपंच झाल्यापासून गावची एकही तक्रार पोलिस स्टेशन ला जावू दिली नाही, परंतु माझ्या गावच्या विकास कामांचा विकासात्मक निधी खासदार साहेबांच्या बगल बच्चांनी माझ्याकडे येवू दिला नाही मी गावच्या विकासासाठी आदरणीय रमेशराव आडसकर साहेबांच्या नेतृत्वा खाली राज्याचे उप मुख्य मंत्री मा. अजीत (दादा ) पवार यांच्या उपस्थितीमध्ये अजीत पवार(राष्ट्रवादी) पक्षात जाहिर प्रवेश करत आहे.
मी खा. बजरंग सोनवणे यांच्या जवळ असताना मोर्चे, आंदोलने यामध्ये उत्स्फुर्त सहभाग घेतला तसेच वेळोवेळी त्यांचा आदेश सर्वस्व मानून प्रामाणिक पणे काम केले परंतु खासदारांच्या जवळचे बडवे,टवाळखोर यांच्या त्रासाला कंटाळून खासदार बप्पांची साथ सोडून राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करत आहे. तसेच
मी निवडणूक वगैरे लढवणार नसून फक्त माझा गाव आणि गावच्या विकासा वर लक्ष केंद्रित करणार असून मी कोणाच्या कुठल्याही आमिषाला बळी न पडता आडसकर साहेबांच्या नेतृत्वा खाली त्यांच्या विश्वासाला तडा न जावू देता संधीचे सोने करत गावचा विकास करणार आहे. खासदार साहेबांच्या अवती भोवती असणारे बगलबच्चे लोकांना कंटाळून जवळचे लोक त्यांची साथ सोडत आहेत अशा गोष्टीकडे खासदार साहेबांनी लक्ष द्यायला हवे.
१)
आमचे नेते आदरणीय रमेश राव आडसकर साहेब हे राजकारणापेक्षा जनतेच्या कामांकडे, हिताकडे लक्ष देतात आम्ही जनतेच्या कामाच्या बाबतीत राजकारण करत नाहीत, त्यामुळे आम्ही संपूर्ण ताकदीने सोनी जवळा गावचे सरपंच गोविंद ससाणे यांच्या पाठिशी भक्कम पणे उभे राहून मा. आडसकर साहेबांच्या नेतृत्वा खाली गावचा विकास करणार आहोत.
ग्रामपंचायत सदस्य तथा अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक.
मिनाज पटेल
२)
सोनी जवळा ग्रामपंचायत च्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार तसेच आमचे जेष्ठ नेते आदरणीय रमेशराव आडसकर साहेब यांचे मला पक्ष प्रवेश दिल्या बद्दल खुप खुप आभारी आहे.
,गोविंद ससाणे.
सरपंच, ग्रामपंचायत सोनी जवळा.
यावेळी मा ,भागवत पवार, अविनाश ससाणे, वैजिनाथ गायकवाड, भागवत कोकाटे, महादेव वसेकर, अनिल ससाणे, कल्याण पवार ग्रामपंचायत सदस्य इत्यादी उपस्थित होते.









Leave a Reply