सततच्या पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई द्या – छावा जिल्हा प्रमुख शिवाजी ( दादा ) ठोंबरे.

सततच्या पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई द्या –छावा जिल्हा प्रमुख शिवाजी ठोंबरे

केज/प्रतिनिधी

 

बीड जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणावर शेतपिके पाण्याखाली गेली असून जनावरांचे तसेच घरांच्या नुकसानीमुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे हाल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर छावा मराठा संघटनेकडून आज केज तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात असे नमूद करण्यात आले की, मुसळधार पावसामुळे तालुक्यातील विविध गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकऱ्यांचे हातचे पीक पाण्याखाली गेले आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी जनावरांचा बळी गेला आहे तर घरांचे व वस्तूंचे नुकसान होऊन सामान्य शेतकरी व नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले आहेत.

यामुळे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना प्रति हेक्टर एक लाख रुपयांची नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी छावा संघटनेकडून प्रशासनाकडे करण्यात आली.

या प्रसंगी छावा मराठा संघटनेचे जिल्हा प्रमुख शिवाजी ठोंबरे, जिल्हा सचिव आसाराम बाबर, दिगंबर तपसे, महादेव धपाटे, भीमराव तपसे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
संघटनेकडून प्रशासनाने तात्काळ शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे ठोस निर्णय घ्यावेत, अन्यथा छावा संघटना तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!