केज येथील तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेस खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद खेळांमधून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो—डॉ हनुमंत सौदागर

 

 

केज (प्रतिनिधी)

 

शहरालगत असलेल्या माऊली विद्यापीठ संचलित

भाऊसाहेब पाटील अध्यापक महाविद्यालयाच्या मैदानावर तालुकास्तरीय दोन दिवसीय कबड्डी स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धेत खेळाडूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला.

महाराष्ट्र शासन क्रीडा विभाग आणि केज तालुका क्रीडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

प्रमुख पाहुणे म्हणून भाऊसाहेब पाटील अध्यापक महाविद्यालयाचे डॉ हनुमंत सौदागर हे उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ हनुमंत सौदागर म्हणाले खेळामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो विद्यार्थ्यांनी कौशल्य आणि सराव याचा वापर केल्यास यश निश्चित मिळते असे मत व्यक्त केले.

विजेत्या संघाचे अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या

क्रीडा स्पर्धेत 45 हुन अधिक संघांनी सहभाग नोंदवला. मुलांच्या 14 वर्षे वयोगटात आश्रम शाळा टाकळी यांच्या संघाने प्रथम तर, महा. वि. बनसारोळा संघ द्वितीय, 17 वर्षे वयोगटात कर्मवीर मा. वि. चिंचोली (माळी) प्रथम तर स्वामी वि. वि. सोनीजवळा द्वितीय आणि 19 वर्षे वयोगटात हनुमान वि. विडा हा संघ प्रथम ठरला तर मुलींच्या 14 वर्षे वयोगटात जीवन शि. केज प्रथम तर महा. वि. बनसारोळा द्वितीय आणि 17 वर्षे वयोगटात स्वामी वि. वि. सोनीजवळा प्रथम तर जि. प. मा. शा.नाव्होली हा संघ द्वितीय ठरला. यावेळी विजेत्या संघाचे अभिनंदन करण्यात आले

स्पर्धेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून केज ता. क्रीडा अधिकारी श्रीमती. राखी यादव , श्री. शेप ए. पी. , श्री. बरडे डी. एस , श्री. एम. गिरी यांनी काम पाहिले तर स्पर्धेचे पंच म्हणून,श्री. शेंडगे , श्री. कांबळे , श्री.पत्रावळे , श्री. तोंडसे , श्री. सुरवसे , आकाश घुले सर इ. काम पहिले. स्पर्धा संपन्न होण्यासाठी सर्व क्रीडा यशस्वी करण्यासाठी शिक्षकांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!