मांजरा नदी पात्रात पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या जनावरांच्या मालकाला मदतीचा हात — आमदार नमिता ताई मुंदडा यांचा पुढाकार.

 

 

केज! प्रतिनिधी

 

केज तालुक्यातील मौजे मांगवडगाव येथे एक दुर्दैवी घटना घडली. श्री. महादेव चादर यांची दोन म्हैस, एक वासरू आणि एक गाय मांजरा नदीच्या पात्रात अडकल्या होत्या. यामध्ये आज एक गाय सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. मात्र, उर्वरित दोन म्हैस आणि एक वासरू हे पाण्याच्या प्रवाहात अडकल्यामुळे मृत्युमुखी पडले.

 

ही घटना समजताच केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मा. नमिता ताई अक्षय मुंदडा यांनी तात्काळ पुढाकार घेतला आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्याला रु. 95,000/- इतकी आर्थिक मदत तत्काळ देण्याचे आदेश दिले.

 

या वेळी गावातील कार्यकर्ते, स्थानिक प्रशासन आणि पशुवैद्यकीय अधिकारी,गावातील तानाजी फरके,निलेश जाधव ,रवी जाधव मेघराज चादर,मोहन फरके,बंडु चादर, गोकुळ इंगळे, सरपंच व इतर सर्व मान्यवर घटनास्थळी उपस्थित होते. स्थानिक जनतेने आमदार ताईंच्या या तत्परतेचे कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!