आदित्य दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ५३९ वृक्षारोपणाचा संकल्प पूर्ण 

 

 

केज दि ६(प्रतिनिधी)

 

माऊली विद्यापीठ शैक्षणिक संकुलामध्ये केज नगरीचे माजी नगराध्यक्ष, काँग्रेस कमिटीचे प्रदेश सरचिटणीस ,तथा माऊली विद्यापीठ केजचे सचिव मा. आदित्य दादा पाटील यांच्या ३९ व्या वाढदिवसानिमित्त माऊली विद्यापीठ शैक्षणिक संकुल परिसरात आज ५३९ वृक्षारोपणाचा संकल्प विविध विद्याशाखा प्रमुखांच्या उपस्थित पूर्ण झाला.

 

माऊली विद्यापीठाचे प्रशासकीय अधिकारी प्रताप मोरे यांच्या नियोजनातून विविध ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आले .वृक्षारोपण उपक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक धनंजय खोसे, सरस्वती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ गौतम पाटील,

भाऊसाहेब पाटील अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य विजयकुमार शिनगारे, रामराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे एकनाथ गोरे, सरस्वती कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका सविता घुले, आदर्श प्राथमिक शाळेचे विलास भिसे, सरस्वती प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नितीन रसाळ

यांसह शिक्षक कर्मचाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले

यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते माऊली विद्यापीठ शैक्षणिक संकुलामध्ये वृक्षारोपण करण्यात आले व प्रत्येक वृक्षाचे पालकत्व सर्वांनी घेतले . यावेळी डॉ.सौदागर बोलताना म्हणाले की,

सचिव आदित्य दादा पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण संकुलात सर्व भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या. यावर्षी सर्वत्र ओला दुष्काळ असल्याने वाढदिवसानिमित्त केवळ समाज उपयोगी उपक्रम घ्यावेत अशा सूचना दिल्यानेच यावर्षी वृक्षारोपण

करण्यात आले

पुढे ते म्हणाले पर्यावरण हे संबंध मानव जातीसाठी समृद्ध असणे काळाची गरज आहे व भविष्याची ती मागणी आहे यासाठी आपण सर्वांनी पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. या वृक्षारोपण कार्यक्रमास माऊली विद्यापीठ परिवारातील सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांची उपस्थिती होती.

 

सोबत फोटो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!