वडिलांचे छत्र हरवलेल्या दोन पाल्यांचे हारुणभाई इनामदार यांनी स्वीकारले पालकत्व.
हारुणभाई इनामदार यांच्या कार्याचे सर्व स्तरातून होतेय कौतुक.
केज!प्रतिनिधी
वडिलांचे छत्र हरवलेल्या दोन पाल्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा जीवन शिक्षण संकुलचे सचिव व जनविकास फाउंडेशनचे प्रमुख हारुणभाई इनामदार यांनी पालकत्व स्वीकारले आहे. जन विकास फाउंडेशन व जीवन शिक्षण संकुलच्या माध्यमातून स्व. अशोक रामकिसन सौदागर यांच्या कुटुंबियांना आधार देण्याचे काम हारुणभाई इनामदार यांनी केली आहे, त्यांच्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, अशोक रामकिसन सौदागर वय ३५ वर्षे रा. अहिल्यादेवी नगर उमरी रोड केज या ठिकाणी त्यांचे आई- वडील, पत्नी व दोन लहान मुलासह वास्तव्यस होते.अशोक सौदागर हे केज शहरातील एका गॅस एजन्सी मार्फत केज शहरातील नागरिकांना गॅस सिलेंडरचे वाटप करून स्वतःच्या कुटुंबाचा उदार निर्वाह करत होते.
परंतु अशोक सौदागर हे शनिवार दिनांक ११ ऑक्टोंबर २०२५ रोजी सायंकाळी च्या वेळी त्यांच्या कुलदैवताच्या यात्रेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील पठाण कुलवडी येथे श्री विठ्ठल बिरुदेव या कुल देवांच्या दर्शनासाठी जात असताना वाटेत नरसिंग वाडी येथील दत्त मंदिर नदीकाठी रविवार दिनांक १२ ऑक्टोंबर २०२५ रोजी सकाळी ५-४५ वाजण्याच्या सुमारास अंघोळ करण्यासाठी गेले असता पाण्यात बुडून अशोक सौदागर यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे अशी प्राथमिक माहिती नागरिकांतून ऐकण्यास मिळत आहे परंतु स्व. अशोक सौदागर यांचा मृत्यू नेमका कसा व कशाने झाला आहे याची अधिकृत माहिती अद्यापही मिळाली नाही.
दिनांक १३ ऑक्टोंबर २०२५ रोजी सकाळी ९-३० वाजता केज शहरातील क्रांतीनगर येथील सार्वजनिक स्मशानभूमी येथे स्व. अशोक रामकिसन सौदागर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक,वैद्यकीय, धार्मिक क्षेत्रसह विविध क्षेत्रातील मान्यवर व स्व.अशोक सौदागर यांच्यावर प्रेम करणारे मित्रपरिवार आणि नागरिक उपस्थित होते.
यावेळी अशोक सौदागर यांना श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त करताना सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले यांच्यासह काही नागरिकांनी स्व. अशोक सौदागर यांच्या कुटुंबियांना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले.
या आवाहनाला प्रतिसाद देत राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा जीवन शैक्षणिक संकुलचे सचिव व जनविकास फाउंडेशनचे प्रमुख हारुणभाई इनामदार यांनी स्व. अशोक सौदागर यांची दोन मुले चि.अथर्व अशोक सौदागर वय ८ वर्षे इयत्ता ३ री, चि.आरुष अशोक सौदागर वय ४ वर्षे यांच्या इयत्ता बारावी पर्यंतच्या शिक्षणाचे पालकत्व स्वीकारले आहे. हारुणभाई इनामदार यांच्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
स्वर्गीय अशोक सौदागर यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी व दोन लहान मुले असे त्यांचे कुटुंब आहे.
चौकट:-
केज शहरात स्व.अशोक रामकिसन सौदागर हे गॅस सिलेंडर वितरण करण्याचे काम करत होते त्यांची परिस्थिती हलकीची असून त्यांच्या जाण्याने सौदागर कुटुंब आज रोजी उघड्यावर आले असून त्यांचे आई-वडील हे देखील वयोवृद्ध आहेत. स्व. अशोक सौदागर यांच्या कुटुंबांना जगण्याचे कसल्याच प्रकारचे साधन नाही व त्यांना कसलाही कोणाचा आधार नाही व त्यांची दोन मुले लहान आहेत मुलाचे शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करणे गरजेचे आहे. सामाजिक, राजकीय,शैक्षणिक, वैद्यकीय,धार्मिक,क्षेत्रसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व सामाजिक संस्थांनी आणि नागरिकांनी स्वर्गीय अशोक सौदागर यांच्या कुटुंबीयांना मदत यावी असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले सर यांच्यासह मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. सदरची मदत ही स्व. अशोक सौदागर यांचे वडील रामकिसन सौदागर यांच्याकडे करण्यात यावी असे सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले सर यांनी म्हटले आहे.
चौकट:-
स्वर्गीय अशोक सौदागर हे तरुण युवक होते ते गॅस सिलेंडर वितरण करण्याचे काम करत होते केज शहरातील प्रत्येक घरामध्ये गॅस वितरण करण्यामुळे प्रत्येक कुटुंबाचे सदस्य बनले होते. आज ते जाण्याने मोठी पोकळी निर्माण झालेली आहे व त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे या सौदागर कुटुंबांना आधाराची व आर्थिक मदतीची फार मोठी गरज आहे त्याकरिता आम्ही आमच्या जनविकास फाउंडेशन व जीवन शिक्षण परिवाराच्या वतीने त्यांच्या दोन मुलांच्या शिक्षणाचे बारावीपर्यंतचे पालकत्व स्वीकारले आहे. याबरोबर जी समाजबांधव जबाबदारी देतील ती आम्ही सौदागर कुटुंबाची जबाबदारी स्वीकारण्यास कटिबद्ध आहोत परंतु सर्वच क्षेत्रातील लोकप्रतिनिधी यांनी पुढे येत सौदागर कुटुंबियांना होईल तेवढी मदत देऊन आर्थिक आधार देण्याचे काम करावे.
सौ.सीताताई प्रदीप बनसोड
नगराध्यक्षा न.प. केज









Leave a Reply