मिनाज पटेल यांच्या नेतृत्वाखालील केज तहसिल कार्यालयावर हंडा मोर्चा  नायब तहसीलदार भंडारी यांनी स्वीकारले निवेदन, योग्य कार्यवाही करुन पाणी पुरवठा लवकर सुरू करु असे दिले आश्वासन  सोनिजवळा येथील ग्रामपंचायत प्रशासन पाणी प्रश्नावर मुग गिळुन गप्प 

 

 

 

केज! प्रतिनिधी

 

केज तालुक्यातील सोनिजवळा येथील जलजिवन मिशन पाणीपुरवठा योजनेच्या व येथील निगरगट्ट प्रशासनाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रमेशराव आडसकर यांचे कट्टर समर्थक मिनाज पटेल‌ यांच्या नेतृत्वाखाली व गावकऱ्यां सह केज तहसिल कार्यालयावर हंडा मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते

 

या बाबत सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील सोनिजवळा हे गाव नेहमी कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत रहाणारे गाव आहे.एकेकाळी याच गावातुन केज शहराची तहान भागवणारे गाव आज हंडा भर पाण्यासाठी वनवन फिरत आहे. गेल्या तीस वर्षांपूर्वी धनेगाव धरणातुन बारागाव पाणीपुरवठा करणारी योजना अंमलात आली आणि त्या योजनेमुळे गावाची तहान भागली परंतु ती योजना जिर्ण झाल्यामुळे नेहमीच तुटफुट होत असल्याचे धनेगाव धरणातुन येणारा पाणी पुरवठा तीव्र उन्हाळ्यात बंद झाला असल्याने येथील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. आशातच २०२३ मध्ये जलजिवन मिशन या नावाची योजना शासनाने सुरू केली आणि सोनिजवळे पासून १५ ते १८ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या जवळबंन धरणातुन सोनिजवळा येथे पाणीपुरवठा करणारी योजना सुरू झाली परंतु कृष्णाई कंट्रक्शन‌ चे गुत्तेदार व जलजिवनचे अधिकारी यांच्या गलथान कारभारामुळे आज पर्यंत पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही तर कामच पुर्ण झाले नाही म्हणून सोनिजवळा येथील संतप्त महिला.पुरूष यांनी सोनिजवळा ग्रामपंचायत सदस्य मिनाज पटेल यांच्या नेतृत्वाखालील तहसिल कार्यालयांवर हंडा मोर्चा चे आयोजन केले होते. यावेळी नायब तहसीलदार भंडारी यांनी निवेदन स्वीकारून दहा दिवसांत नळाद्वारे पाणी पुरवठा करण्याचे आदेश दिले जाईल, जर वेळेत पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही तर कृष्णाई कंट्रक्शन‌ चे गुत्तेदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल असे आश्वासन नायब तहसीलदार भंडारी यांनी दिले. यामुळे केज तालुक्यातील सोनिजवळा येथील पाणी प्रश्न पेटल्याची चर्चा तालुक्यातील रंगाली आहे. ४ कोटी १३ लाख रुपये किंमतीची योजना गेल्या २०२३ मध्ये मंजूर झाली व त्या योजनेचा काम पुर्ण करण्यासाठी चा कालावधी १८ महिन्याचा होता परंतु निष्क्रिय गुत्तेदार व संबंधित जलजिवन मिशन योजनेचे अधिकारी असल्याने आज पर्यंत काम पूर्ण झाले नसल्याचे दिसत आहे. दहा दिवसांत नळाद्वारे पाणी पुरवठा झाला नाही तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा या वेळी आंदोलन कर्तेनी दिला आहे.

 

सोनिजवळा ग्रामस्थांनी मिनाज पटेल यांच्या नेतृत्वाखालील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसील कार्यालय केज आसा हंडा मोर्चा काढला होता.या मध्ये महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.तहसिल कार्यालयावर मोर्चा धडकल्यानंतर पाणी आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाचा, कोण म्हणतंय देत नाही घेतल्या शिवाय रहात नाही. कृष्णाई कंट्रक्शन‌ वर गुन्हे दाखल करा अशाप्रकारे घोषणेने तहसील कार्यालय दणाणले होते.या वेळी नायब तहसीलदार भंडारी यांनी आंदोलन कर्त्या महिला.पुरुष यांच्या सोबत सविस्तर चर्चा केली गुत्तेदार यांनी दिलेल्या मुदतीत काम पूर्ण नाही केले तर गुन्हा दाखल करण्यात येईल त्याला पाठिशी घालणार नाही व गुत्तेदाराची पाठराखण करणार नाही तहसील प्रशासना तुमच्या सोबत आहे आसे आश्वासन दिल्याने मोर्चा थांबवण्यात आला आता काय कार्यवाही होणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!