नायगाव येथे जागतिक आरोग्य दिन उत्साहात साजरा ——————————— कार्यक्रमातून नागरिकांना निरोगी जीवनशैलीचा दिला संदेश

 

 

केज:- प्रतिनिधी

 

वर्ल्ड हेल्थ डे निमित्त आयुष्मान आरोग्य मंदिर धनेगाव अंतर्गत नायगाव येथे जागतिक आरोग्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

 

यावेळी नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जनजागृती करण्यासाठी प्रभात फेरी काढण्यात आली. प्रभात फेरीत आरोग्यविषयक घोषवाक्ये देत माझे गाव आरोग्य संपन्न गाव, स्वच्छता, योग्य आहार, नियमित व्यायाम,क्षयरोग, व HPV लसीकरणाचे महत्त्व पटवून देण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील गोरमाळी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

या प्रसंगी पुढील मान्यवर व कर्मचारी उपस्थित होते.

 

यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील गोरेमाळी,सरपंच विवेक खोडसे,आरोग्य सेवक मणियार कैफ, आरोग्य सेविका अनुराधा शिंदे, आशा स्वयंसेविका संध्याताई मुजमुले ,अंगणवाडी सेविका,मुमताज शेख,अभिलाषा मुजमुले, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब गोरे,यांच्यासह इतर शिक्षक बांधव यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ कार्यक्रमात सहभागी झाले होते. या उपक्रमातून नागरिकांना निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!