केज येथे चाईल्ड प्रायमरी स्कूलचा” स्वराज्य बाल महोत्सव उत्साहात.

केज येथे चाईल्ड प्रायमरी स्कूलचा “स्वराज्य बालमहोत्सव उत्साहात

 

केज दि (प्रतिनिधी)
येथील चाईल्ड प्रायमरी स्कूलच्या वतीने स्वराज्य बालमहोत्सव वार्षिक स्नेहसंमेलन शनिवार रोजी उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्रप्रमुख संजय चौरे
कार्यक्रमाचे उद्घाटक गट शिक्षणाधिकारी सुनील केंद्रे , विशेष उपस्थिती अंबा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ज्येष्ठ नेते रमेशराव आडसकर, प्रमुख अतिथी भाई मोहन गुंड, डॉ. हनुमंत सौदागर, हनुमंत भोसले, डॉ. नागेश कराळे, अॅड. अविनाश धायगुडे, शिवाजी ठोंबरे, कृष्णाजी थोरात, गोविंद ससाणे, उपेंद्र शिंदे, ज्ञानेश्वर बिराजदार, एच. पी. देशमुख, शरीफ सय्यद, चंद्रकांत पाटील, दत्ता मुजमुले, अनिल गलांडे, विष्णु तपसे, अजय चाटे, साईनाथ गावडे, अलीम सय्यद, अक्षय येवले आदी उपस्थित होते.

स्नेहसंमेलनात मराठी,हिंदी लोकगीत भावगीत धमाल कॉमेडी पर्यावरण शिक्षण अंधश्रद्धा निर्मूलन अशा विविध विषयावर नृत्य, गीत, नाटिका, शेतकरी गीत तसेच देशभक्तीपर सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या आकर्षक व रंगतदार सादरीकरणामुळे प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.

यावेळी बोलताना रमेशराव आडसकर म्हणाले सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो असे मत व्यक्त केले.कार्यक्रमाचे उद्घाटक गट शिक्षणाधिकारी केंद्रे म्हणाले केज तालुक्यातील उपक्रमशील शाळा म्हणून या शाळेकडे पाहिले जाते व ही गुणवत्ता पूर्ण शिक्षण देणारी शाळा आहे.” इतर मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत शिक्षणाबरोबरच सांस्कृतिक व क्रीडा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते, असे मत त्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक संस्थेचे संचालक श्री. शरद गिराम यांनी केले. यावेळी त्यांनी, आम्ही विद्यार्थ्यांना कृतीप्रधान शिक्षण देतो असा शाळेचा प्रगती अहवाल वाचन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे मुख्याध्यापक, श्रीमती शिंदे , श्रीमती साखरे , श्रीमती तपसे , श्रीमती राऊत , श्रीमती पुरी , भाऊसाहेब शिंदे, हर्षद गिराम, सचिन गिराम,प्रकाश काळे ,अनिल चटप, बिरूदेव भंडारे, गोरख चाळक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. उत्कृष्ट नियोजन व व्यवस्थापनाबद्दल उपस्थितांनी शाळेच्या कार्याचे कौतुक केले. कार्यक्रमास विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!