मातृत्व आणि दातृत्व यांची सांगड घालून केज मतदार संघाचा विकास करणारी “हिरकणी” म्हणजे सौ. नमिता ताई मुंदडा.

मातृत्व आणि दातृत्व यांची योग्य सांगड घालून केज मतदार संघाचा विकास करणारी “हिरकणी”
म्हणजे सौ.नमिता ताई मुंदडा.

केज! प्रतिनिधी

मनदानाचा दिवस जसजसा जवळ येत आहे तसे केज विधान सभा मतदार संघात वातावरण तापू लागले आहे, प्रत्येक उमेद्वार हे आपले व्हीजन काय असेल हे जनतेला पटवून सांगत आहेत
परंतू केज मतदार संघात भाजपाच्या उमेद्वार सौ.नमीता ताई मुंदडा प्रचारात आघाडीवर आहेत त्यांनी मातृत्व आणि दातृत्व याची योग्य सांगड घालून केज मतदार संघात विकास काय असतो हे दाखवून दिले, आपले लहान, चिमुकले बाळ पाठीशी बांधून सौ. नमिता ताईंनी विधान सभेत आवाज उठवून, प्रत्येक टेबलवर मतदार संघाच्या विकासाच्या फाईल्स फिरवून कोठ्यावधी रुपयांचा विकास निधी खेचून आणला आणि विकास काय असतो किंवा विकास कशाला म्हणतात हे जनतेला दाखवून दिले. समाजासाठी, जनतेसाठी विकासाची कामे करतांना अनेक अडचणींचा सामना करून केज मतदार संघाला महाराष्ट्रात एक वेगळे स्थान मिळवून दिले.केज मतदार संघातील जनतेशी त्यांच्या कुटुंबाची आपुलकिची नाळ घट्ट जोडलेली आहे कारण जेष्ठ समाजसेवक नंदकिशोरजी ( काकाजी )मुंदडा तसेच युवा नेते अक्षय भैय्या मुंदडा यानी प्रत्येक गाव,तांडा,वाडी, वस्ती,वरील सामान्य जनतेच्या सुख दुःखात सहभागी हो उन, आपुलकीची साद घातली, मतदार संघातील जनतेच्या,समाजाच्या विकासासाठी मातृत्व आणि दातृत्व याची योग्य सांगड घालून म तदार संघाच्या विकासाचा गड सर करून मतदार संघातील प्रत्येक नागरीका पर्यंत विकासाची कामे पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला यामुळे मुंदडा कुटुंबाची केज मतदार संघात एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. केज मतदार संघातील प्रचारात रंगत येवू लागली असून सध्या वातावरण तापू लागले असले तरी मातृत्व आणि दातृत्व याची योग्य सांगड घालून केज मतदार संघाचा विकास करणाऱ्या “हिरकणी” म्हणजेच सौ. नमिताताई मुंदडा यांना मतदार संघातील जनता पुन्हा संधी दिल्या शिवाय राहणार नाही अशी चर्चा जनतेतून जोर धरु लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!