बुद्धंम शरणम् गच्छामि संगीतमय महानाटयाने केजकरांना जिंकले.

बुद्धंम शरणम् गच्छामि संगीतमय महानाट्याने केजकरांना जिंकले

केज शहरात प्रथमच नाटकाच आनंद सर्व जाती-धर्माच्या नागरीकांची उपस्थिती.

केज (प्रतिनिधी)
क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त केज येथे बुद्धंम शरणम् गच्छामि या संगीतमय महानाट्याचे आयोजन भारतीय शेतकरी कामगार पक्ष, क्रांतीसिंह नाना पाटील प्रतिष्ठान यांच्या वतीने भाई मोहन गुंड यांनी केले होते.

संगीतमय महानाट्य रविवार, दि. १९ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता भवानी चौक येथील मुक्ताई फंक्शन हॉलमध्ये हा कार्यक्रम सायं. ७.०० वाजता महानाट्य सुरू झाला, हैद्राबाद येथील अभ्युदय आर्ट्स अकादमीचे २२ नाट्यकलावंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील संघर्ष गाथा हिंदी भाषेतून प्रभावीपणे सादर केले. कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ नेते रणजितसिंह पाटील, माजी पंचायत समिती सभापती राजेसाहेब पापा देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती माजी आमदार संगीता ठोंबरे, शेकापचे कार्यालयीन सहचिटणीस डॉ उमाकांत राठोड, चिटणीस मंडळ सदस्य भाई दिगंबर कांबळे, शिक्षक आघाडीचे नेते भाई चंद्रकांत चव्हाण , शेतकरी कामगार पक्षाचे पूर्व जिल्हा चिटणीस ॲड नारायण गोले पाटील, शेकापचे पश्चिम जिल्हा चिटणीस बापूसाहेब सोळंके, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राहुल खोडशे छावाचे जिल्हाध्यक्ष शिवाजी ठोंबरे , माजी उपनगराध्यक्ष इनामदार माजी नगराध्यक्ष कबीरोदिन इनामदार आरपी आयचे तालुकाध्यक्ष दीपक कांबळे, नगरसेवक सोमनाथ गुंड, समाजवादीच्या नेत्या सालेहा शेख पठाण, माजी नगरसेवक कपिल मस्के सामाजिक कार्यकर्ते अशोक गायकवाड, बहुजन वंचित आघाडीचे लिंबराज गायकवाड, समता सैनिक डॉ प्रभाकर ठोके, भारतीय बुद्ध महासंघ जयपाल मस्के
आरपीआयचे ज्येष्ठ नेते दिलीप बनसोडे, सुशील तात्या टोपे , प्रियंका लांडगे, गौतम बचुटे, शरद थोरात, रोहित कसबे, पत्रकार संतोष गालफाडे, पत्रकार महादेव गायकवाड यांची उपस्थिती होती..

या संगीतमय महानाट्यासाठी प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला असून महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था करण्यात आली होती. या कार्यक्रमाला महिलांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
केज शहरात प्रथमच भव्य संगीत महानाट्याचा प्रयोग :- केज शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांवर सादर करण्यात आलेले संगीतमय महानाट्य केज करांना पाहण्याची संधी उपलब्ध करून दिल्या बद्दल आयोजक शेकापचे नेते भाई मोहन गुंड यांचे सर्वत्र सर्वच समाज बांधवा कडून कौतुक होत आहे.
कलाकार एवढे हुबेहुब पात्र सादर करत होते की प्रेक्षक भाऊक झाले महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील बैलगाडीतून खाली उतरणे, शाळेत वेगळे बसायला लागणे, औषधं वीणा मुलांचा आणि रमाईचा मृत्यू याने महिला प्रेषकांच्या डोळ्यात पाणी तरळले तर चवदार तळ्याचा संघर्ष, पुणे करार, काळाराम मंदिर सत्याग्रह, डॉ बाबासाहेब आंबेडकर विलायतेहून आल्या नंतर शाहू महाराजांनी केलेला त्यांचा सत्कार आणि राज्यघटना देशाला अर्पण करण्याच्या हुबेहूब कलाकारांनी सादर केलेला प्रसंग पाहून प्रेक्षकांनी जोरदार घोषणांनी हॉल दणाणून सोडला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी भाई अशोक रोडे, ॲड. निखील बचुटे, निखिल समुद्रे, रंजित घाडगे, प्रदीप गायकवाड, शेख रज्जाक, अक्षय हजारे, गुड्डू खतीब, मंगेश देशमुख, राजेभाऊ गुंड, अजिंक्य माने नावेद मुलानी दत्ता वाघमारे रामलिंग पाटील यांनी परिश्रम घेतले. या महानाट्याची चर्चा पूर्ण तालुका भरामध्ये आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!