साबला येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

साबला येथे ” पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ” यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

केज! प्रतिनिधी

महाराष्ट्र शासन,महिला व बाल विकास विभाग,मुंबई यांच्या आदेशानुसार ग्रामपंचायत कार्यालय,साबला.येथे सरपंच जनाबाई नरहरी काकडे,ग्रामपंचायत सदस्या आश्रुबाई श्रीमंत काकडे , पार्वती महादेव नाईकनवरे यांच्या हस्ते प्रथम ” पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ” यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुढील कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त.गावातील ज्या महिला सामाजिक,सांस्कृतिक,शैक्षणिक,धार्मिक,आरोग्य विषयक समाजकार्यात उत्कृष्ट काम करत असलेल्या महिलांना ग्रामपंचायत कार्यालय,साबला.सरपंच जनाबाई नरहरी काकडे,ग्रामपंचायत सदस्या आश्रुबाई श्रीमंत काकडे,पार्वती महादेव नाईकनवरे यांच्या शुभ हस्ते सुनिता अशोक काकडे,अनिता रामराजे शिंदे,छायाबाई बारिकराव काकडे,मंगल बालाजी काकडे,आशाबाई अंकुश मुळे,राधा राम काकडे,सारिका विजय नाईकनवरे,सुरेखा विष्णू कटारे,सुरेखा श्रीराम राऊत,आम्रपाला सुधीर सरवदे,मिरा संभाजी घाडगे,आरती अनिल सरवदे वरील इत्यादी महिलांना ” पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार ” देऊन सन्मानित करण्यात आले.
तसेच यावेळी आंगणवाडी मदतनिस वैशाली विजय सरवदे,केशरबाई अभिमान सरवदे,ऋतुजा ईश्वर नाईकनवरे,ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर पांचाळ,पोलिस पाटील अविनाश गुलाब काकडे,समाजसेवक नरहरी काकडे,रामराजे शिंदे,गणेश कटारे,अशोक काकडे,बारिकराव काकडे,योगिराज मुळे,आश्रुबा नाईकनवरे,हनुमंत मुळे,माऊली नाईकनवरे,रामराजे काकडे,बाबासाहेब काकडे,शाम काकडे,फोटो ग्रापर राहुल मुळे, नितिन काकडे तसेच या कार्यक्रमासाठी गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!