शिवसेना अल्पसंख्याक विभाग केज तालुका प्रमुखपदी सय्यद माजेद यांची निवड,सय्यद माजेद यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
केज/प्रतिनिधी
शिवसेना अल्पसंख्याक विभागाच्या केज तालुका प्रमुखपदी पत्रकार सय्यद माजेद यांची निवड करण्यात आली आहे.त्यांना नियुक्ती पत्र अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा प्रमुख ॲड. लालाखान पठाण यांनी दिले आहे.निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे व धर्मविर आनंद दिघे यांची शिकवण व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,युवासेना प्रमुख खासदार श्रीकांत शिंदे,अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष तथा विधान परिषद आमदार सईद खान यांच्या आदेशावरून सय्यद माजेद यांची शिवसेनेच्या अल्पसंख्याक विभागाच्या केज तालुका प्रमुख पदाची जबाबदारी अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा प्रमुख ॲड. लालाखान पठाण यांनी सोपविली आहे.
सय्यद माजेद यांना शिवसेना पक्षाचे विचार तळागाळा तील लोकांसह सर्व सामान्य माणसापर्यंत पोंहचवून शिवसेना पक्ष वाढीसाठी प्रयत्न करावेत.तसेच सर्व समाजातील लोकांच्या सेवेत राहून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा. अशा सूचना दिल्या आहेत. निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.दरम्यान सय्यद माजेद यांच्या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत असुन त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.









Leave a Reply