नेतृत्व, आत्मविश्वास व सामाजिक जबाबदारी ची जाणीव ठेवून विद्यार्थ्यांनी कार्य करावे – प्रा. माधुरी मुंडे.

*नेतृत्व,आत्मविश्वास व सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेऊण विद्यार्थ्यांनी कार्य करावे – प्रा.माधुरी मुंडे*

*केजच्या विक्रमराव मुंडे पोदार लर्न स्कूल येथे विद्यार्थी मंत्रिमंडळाचा पदग्रहण समारंभ संपन्न..*

केज ! प्रतिनिधी

*विक्रमराव मुंडे पोदार लर्न स्कूल, केज येथे विद्यार्थी मंत्रिमंडळाच्या पदग्रहण (Investiture Ceremony) समारंभाचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून संस्थेच्या विश्वस्त सौ.प्रा.माधुरीताई मुंडे उपस्थित होत्या.विद्यार्थ्यांनी नेतृत्व, आत्मविश्वास आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून कार्य करण्याचे आवाहन प्रा.माधुरीताई मुंडे यांनी केले.*

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.डॉ.हनुमंत सौदागर तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व मान्यवर,सदस्य यांची उपस्थिती होती.यावर्षी विद्यार्थी मंत्रिमंडळाची निवड लोकशाही पद्धतीने निवडणुकीद्वारे करण्यात आली. त्यामध्ये आदित्य गिते यांची हेड बॉय तर अनुष्का सिरसाट हिची हेड गर्ल म्हणून निवड झाली. विद्यार्थी जीवनात लोकशाहीची मूल्ये, मतदानाचे महत्त्व, नेतृत्वगुण आणि जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यासाठी अशा निवडणूक प्रक्रियेचे विशेष महत्त्व असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थी पदाधिकाऱ्यांना बॅज, सॅश व पदाची शपथ देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे, जबाबदारीने आणि नेतृत्वगुण जोपासत शाळेच्या प्रगतीसाठी कार्य करण्याची शपथ घेतली.प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. हनुमंत सौदागर यांनी विद्यार्थ्यांना नेतृत्व, शिस्त, जबाबदारी, सेवाभाव आणि संघ भावनेचे महत्त्व पटवून देत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनीही नव्याने निवड झालेल्या विद्यार्थी प्रतिनिधींना शुभेच्छा देऊन त्यांच्या यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन व मार्गदर्शन दादाराव जमाले पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. तसेच शाळेचे प्राचार्य जेस जोसेफ सर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे मार्गदर्शन केले.संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. उपस्थित मान्यवर, पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी नव्याने निवड झालेल्या विद्यार्थी प्रतिनिधींचे अभिनंदन करत त्यांच्या नेतृत्व गुणांचे मनापासून कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!