केज (प्रतिनिधी)
केज विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार संगिता ठोंबरे यांनी विधानसभा निवडणूकीतून उमेदवारी माघारी घेतल्यानंतर आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. त्यांच्यावर राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पक्षाची जिम्मेदारी मिळतात पक्षाचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांच्यासाठी माजी आमदार संगीताताई ठोंबरे ह्या मतदारसंघात आपल्या जिवाचे रान करताना दिसून येत आहे. बीड जिल्ह्याचे खा. सोनवणे यांच्या उपस्थितीत माजी आ. संगिता ठोंबरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. यावेळी ठोंबरे यांना पक्षाच्या वतीने मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात
आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या स्वाक्षरीचे नियुक्तीपत्र ठोंबरे यांना खा. बजरंग सोनवणे यांच्या हस्ते देण्यात आले आहे. माजी आमदार संगीता ताई ठोंबरे यांची निवड होतात त्यांनी केज विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांच्या प्रचारासाठी चांगली कंबर कसली आहे त्यांनी मतदारसंघातील अनेक गावांना भेटी दिल्या आहेत









Leave a Reply