सौ.नमिता ताईंच्या प्रचाराला जनतेचा मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहून विरोधकांनी घेतली धास्ती .
केज! प्रतिनिधी
केज विधानसभेच्या आमदार नमिता मुंदडा,पती अक्षय मुंदडा, सासरे नंदकिशोर मुंदडा यांच्या अथक परिश्रम,नियोजन बद्ध व सातत्यपूर्ण प्रचारा मुळे महायुतीचे उमेदवार सौ.नमिता मुंदडा यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतल्याची चर्चा जन मानसात आहे. त्यांना मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहून विरोधकांनी धास्ती घेतल्या शिवाय राहणार नाहीत आ.नमिता मुंदडा यांना मानणारा मोठा वर्ग शहरासह ग्रामीण भागात असून त्यांच्या प्रचारास जनतेतून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे पाहून विरोधकांना धड़की भरल्याचे दिसून येत असून त्यांनी आणलेल्या विकास निधीमुळे मतदार संघात उत्साहाचे वातावरण आहे.याचा सरळ लाभ २०२४ च्या केज विधानसभा निवडणुकीत होताना दिसत आहे.उप मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस व भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या विकासवादी लोकाभिमुख नेतृत्वावर विश्वास ठेवून केज विधानसभा मतदार संघामध्ये भाजपाला मोठे आश्वासक स्वरूपाचे वातावरण निर्माण झाले आहे.या शिवाय सर्व सामान्यांशी असलेल्या सुसंवादामुळे नमिता मुंदडा यांना प्रचारात मोठी आघाडी मिळाली आहे.महिला संवाद यात्रा,बचत गट मेळावे,गौरी सजावट,लाडकी बहीण योजना,तसेच महिला उत्कर्षाचे अनेक अभियान राबवून महिलांमध्ये नमिता मुंदडा यांनी स्वतःचा मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे.नमिता मुंदडा यांच्या रूपाने महिलांच्या हक्काचा प्रतिनिधी संसदेत पाठविणे गरजेचे असल्याने प्रत्येक चौक बैठका व सभे मध्ये नमिता मुंदडा यांच्या प्रचारार्थ महिला व मतदार बांधव मोठ्या संख्येने जमत आहेत. नंदकिशोर मुंदडा हे स्वतः केज मतदार संघाचे नियोजन करत असल्यामुळे जुन्या जाणत्या, निष्ठावानांचा सहभाग प्रचारात वाढला आहे. गावनिहाय भेटी आणि बूथ नियोजनातही नंदकिशोरजी मुंदडा काकाजी हे लक्ष घालत असल्यामुळे नमिता मुंदडा यांना मोठे मताधिक्य मिळेल असा राजकीय जाणकारांचा होरा आहे. केज मतदार संघातील भाजपाच्या सर्कलनिहाय संवाद बैठकीमुळे अक्षय मुंदडा,नंदकिशोर मुंदडा काकाजी यांचे शहरी व ग्रामीण कार्यकर्त्याशी होणारी चर्चा नमिता मुंदडा यांना प्रचारात आघाडी मिळवून देत आहे.ग्रामीण व शहरी भागात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी चौफेर सभांचा धडाका लावला आहे.ग्रामीण भागातील संवाद दौऱ्यामुळे सुरुवातीला महाविकास आघाडीला पूरक वाटत असलेले वातावरण आता पूर्णत: महायुतीकडे झुकलेले पाहून विरोधकांना धडकी भरल्या शिवाय राहणार नाही.









Leave a Reply