महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेद्वार रमेश तात्या गालफाडे यांनी गाजवली सभा.
सामान्यांच्या डोळ्यात धूळ फेकणाऱ्या पेक्षा बहुजनांचा विकास करणाऱ्या रमेश गालफाडे यांना निवडून द्या – रमेश तात्या गालफाडे.
केज! प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार रमेश तात्या यांनी केज विधान सभेच्या प्रचारार्थ मा. राज ठाकरे यांची सभा आयोजीत केली परंतु कांही तांत्रीक कारणांमुळे मा. राज ठाकरे येऊ शकले नाही परंतु सदरील आयोजीत केलेल्या सभे मध्ये मनसेचे, केज विधान सभेचे अधिकृत उमेदवार यांनी तडाखेबंद भाषण केले, त्यांनी सांगितले कि,
चाळीस वर्षे सत्ता भोगनार्यां ना जनतेने प्रश्न विचारायला हवा, कुठं आहे विकास, इथ मतदार संघात खडड्यात रस्ते कि रस्त्यात खड्डे हेच कळत नाही, हाच का विकास संविधानाने दिलेली घटना समजून घ्या, प्रामाणिक, स्वच्छ चारीत्र्याचा, अभ्यासू, विकासाचा ध्यास असणारा उमेदवार जनतेने निवडून द्यावा तसेच पुढे बोलतांना त्यांनी सांगितले की बहुजनांची लेकरं शिकली पाहिजेत, आजकाल नोकरी नाही त्यामुळे कुटुंबाची वाताहात होते, आज बेकारी वाढली असून बेरोजगारांच्या हाताला रोजगार नाही तो मिळायला पाहिजे,ज्या दिवशी बहुजनांची मुलं शिकतील त्यावेळी दशातील भ्रष्टाचार्यां ची दुकानदारी बंद पडेल, आज फक्त सामान्यांच्या डोक्यात फक्त धूळ फेकली जाते,बेकारी कमी करण्यासाठी केज मतदार संघात एम. आय.डी.सी व्हायला हवी. आज शेतकऱ्याच्या शेतमाला ला भाव नाही, सिलेंडर गॅस, महागला,तेल महागले, सर्व जिवनाश्यक वस्तू महागल्या, काळा पैसा आला नाही १५, लाख बँकेत आले नाही, जनतेला फसवणाऱ्या सरकारला त्यांची जागा दाखवून द्या. “अब राजा का बेटा राजा नही होगा, जो हकदार है वही राजा बनेगा”, या सरकारनं भ्रष्टाचाराच्या आगी त गोरगरीबांची घरे जाळली, रमेश गालफाडे यांनी अँब्युलंस ची सोय गोरगरीब जनतेची सेवा करण्यासाठी दिली, कोरोना मध्ये जनतेला मदत केली,मतदार संघात विकास करण्याची ज्यांची मनापासून तळमळ आहे. विकास करण्याची जिद्द आहे, समाजाविषयी तळमळ आहे, म्हणून येत्या वीस तारखेला मनसे चे उमेद्वार मा. रमेश तात्या गालफाडे यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या. “बदल हवा उमेद्वार नवा” जनतेचे किती खावे हे ज्यांना कळत नाही त्यांना त्यांची जागा दाखवून द्या. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच यावेळी पंचक्रोशीतील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.









Leave a Reply