नमिताताईंच्या डोअर टू डोअर प्रचाराला केज मतदार संघातील जनतेतून तूफान प्रतिसाद.

नमिताताईंच्या डोअर टू डोअर प्रचाराला केज मतदार संघातून तुफान प्रतिसाद.

“लोकनेत्या.आ.पंकजाताई मुंडे व मा.खासदार प्रीतमताई मुंडे प्रचारात उतरल्या मुळे नमिताताईंचा विजय निश्चित.

केज!प्रतिनिधी
केज मतदार संघात नमिता ताईंच्या डोअर टू डोअर प्रचाराला जनतेतून तूफान प्रतिसाद मिळत असून लोकनेत्या.आ.पंकजाताई मुंडे आणि मा.खा.डॉ. प्रितमताई मुंडे प्रचारात उतरल्या मुळे नमिताताईंचा विजय निश्चित होणार असे जनतेतून बोलले जात आहे
मागील पाच वर्षांमध्ये केज मतदार संघामध्ये विद्यमान आमदार नमिताताई मुंदडा यांनी केलेल्या विकास कामामुळेच केज मतदार संघामध्ये त्यांना भरभरून प्रतिसाद मिळत आहे. विद्यमान आमदार नमिताताई मुंदडा यांच्या विजयासाठी आमदार पंकजाताई मुंडे व माजी खासदार प्रीतमताई मुंडे या दोघी बहिणी निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. केज मतदार संघातील गावागावा मध्ये जाऊन नमिताताई मुंदडा यांना मतदान करून विजयी करण्याचे आवाहन करत आहेत. नमिताताई मुंदडा यांनी मागील पाच वर्षांमध्ये रस्ते, पाणी सांस्कृतिक सभागृह सह विविध विकास कामे केली आहे त्याचबरोबर मतदार संघातील अनेक तीर्थक्षेत्रांना मोठ्या प्रमाणात निधी देऊन तीर्थक्षेत्रांचा विकास केला आहे. याच विकास कामाच्या जोरावर सध्या होऊ घातलेल्या विधान सभेच्या निवडणुकीत विद्यमान आमदार मुंदडा या मतदान मागत आहेत व त्यांनी केलेल्या विकास कामामुळेच जनता त्यांच्या पाठीमागे उभी आहे व त्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे असे चित्र सध्या मतदारसंघांमध्ये निर्माण झाले आहे. पाठीमागील कोविंडच्या काळामध्ये देखील जनतेला नमिताताई मुंदडा सह त्यांच्या कुटुंबाने मोठा आधार देण्याचे काम केले मुंदडा परिवार हा कोविंड सारख्या महामारीत देखील जनतेसाठी अहोरात्र काम करीत होते त्याच कामाची पोचपावती म्हणून आज सर्वसाधारण नागरिक त्यांना निवडून आणण्यासाठी अहोरात्र काम करत आहेत. स्वर्गीय विमलताई मुंदडा यांनी पाठपुरावा करून त्यांच्या कार्यकाळामध्ये शासकीय रुग्णालयाचे बांधकाम हे लोखंडी येथे केल्यामुळे कोविंडच्या काळात मतदार संघातील रुग्णांना त्याचा फायदा झाला आहे. लोकनेत्या पंकजाताई मुंडे व माजी खासदार प्रीतम ताई मुंडे या दोघी बहिणी केज मतदार संघातील ग्रामीण भागात ठीक ठिकाणी गाव भेटी दौरा करत कॉर्नर बैठका घेत आहेत दोघेही बहिणी नमिताताई मुंदडा यांच्या प्रचारात अग्रेसर आहेत त्यामुळे नमिता मुंदडा यांचा विजय निश्चित असल्याची नागरिकातून चर्चा ऐकण्यास मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!