केज/प्रतिनिधी
पृथ्वीराज साठे यांच्या प्रचारार्थ केज शहरात हारुणभाई इनामदार व सौ.सीताताई बनसोड यांचा प्रचार दौरा चालू असून जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख हारुणभाई इनामदार यांनी संपूर्ण केज शहरांमध्ये डोर टू डोर दौरा काढून मतदारांशी संवाद साधून महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज शिवाजी साठे यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन करत आहेत. शनिवार रोजी केज शहरातील महात्मा फुले नगर येथील वार्ड क्रमांक सात आठ नऊ मध्ये शेकडो कार्यकर्त्यांना सोबत घेऊन हारुणभाई इनामदार व सीताताईत बनसोड यांनी डोर टु डोर प्रचार दौरा केला आहे. त्यांच्या या प्रचार दौऱ्याला शहरातून भरभरून पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येत आहे. यावेळी मध्यमाशी बोलताना हारुणभाई इनामदार म्हणाले की, पृथ्वीराज साठे यांचा विजय हा निश्चित आहे आम्हाला या प्रचार दौऱ्याच्या माध्यमातून जनसामान्याचा मोठा पाठिंबा मिळत आहे व शेवटच्या घटकापर्यंतचा माणूस हा पृथ्वीराज साठे यांना मतदान करण्यासाठी तत्पर असल्याचे बोलत आहेत असे बोलताना इनामदार यांनी सांगितले आहे. पुढे बोलत नाही इनामदार म्हणाले कीप्रत्येक पृथ्वीराज साठे यांचा विजय आता कोणी रोखू शकत नाही त्यामुळे आता घाबरून जायची गरज नाही आम्ही निश्चित आहोत.









Leave a Reply