*खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांचा होळ, युसुफवडगाव सर्कल मध्ये झंझावाती दौरा.*

 

 

केज/प्रतिनिधी

 

खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांनी होळ, युसुफ वडगाव सर्कल पिंजून काढले असुन गावागावात जाऊन सभा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांच्या प्रचारार्थ गावोगावी सभा घेऊन गावातील समस्या शेतकऱ्यांच्या पिकांना भाव मिळवून देणे व लोडशेडींग मुक्त करण्यासाठी काम केले जाईल एकाचा सुद्धा ऊस राहणार नाही यांची ग्वाही देतो असेसांगितले.विरोधी पक्षाच्या नेत्यांनी काय काम केले ते सांगावे कुठे कुठे निधी आणला सांगा तुमची सत्ता असून काय दिवे लावले ते सांगावे असा थेट सवाल खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांनी उपस्थित केला आहे विकास फक्त पृथ्वीराज साठेच करू शकतात कारण चोवीस तास उपलब्ध असणारा कामाचा माणुस म्हणजे साठे आहे.गोरगरिबांसाठी शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी रोडवर उपलब्ध असतात आणि विरोधक कोठे गायब असतात असा थेट सवाल उपस्थित केला. खासदार बजरंग बप्पा सोनवणे म्हणाले की,केज मतदार संघाचा आमदार आता पृथ्वीराज साठेच होणार गावा गावातून भरपूर प्रतिसाद मिळत आहे.कारण विरोधकांनी स्वतः चीच घरे भरली आहेत.आता मी खासदार आहे पृथ्वीराज साठे आमदार होणारच विकासाच्या बाबतीत जनतेने काळजी करू नये असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!