केज /प्रतिनिधी
दीक्षाभुमी ते मंञालय पञकार संवाद याञा महाराष्ट्र राज्य पञकार संघ,मुंबईचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या नेतृत्वाखाली पञकारांच्या प्रश्नांवर प्रकाश टाकण्यासाठी आयोजित करण्यात आली होती.या संवाद याञेस विवीध पक्ष व संघटना पञकार यांनी चांगला प्रतिसाद दिला होता.या संवाद याञेचा समारोप मंञालय,मुंबई येथे विवीध खात्याचे मंत्री तसेच पक्षाचे पदाधिकारी यांच्या उपस्थीती मध्ये यशवंतराव चव्हाण सभागृह येथे पार पडला होता.या संवाद याञेतील प्रसंगाची क्षणचिञे व पञकार बांधव यांची मनोगत या वृतांत पुस्तकात नमुद केले आहेत.या वृतांत पुस्तकाचे विमोचन केज येथे महाराष्ट्र राज्य पञकार संघ,मुंबई चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे,मराठवाडा अध्यक्ष वैभव स्वामी यांच्या उपस्थीती मध्ये पञकारांच्या समवेत विमोचन करण्यात आले यावेळी पञकार श्रावण कुमार जाधव,रामदास तपसे,अजय भांगे,दशरथ चवरे,नंदकुमार मोरे,रमेश गुळभिले,चंद्रकांत पाटील तात्या गवळी,तसेच विधीज्ञ जीवनराव बांगर,प्रमोद नाईकवाडे आदी मान्यवर उपस्थीत होते.









Leave a Reply