आ.नमिताताईंच्या विजयासाठी भाजपा च्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकत्यांनी लोकनेत्या. आ.पंकजाताईंना दिलेला विश्वास सार्थ करून दाखवला- भगवान केदार, भाजपा ता. अध्यक्ष केज.
“नंदकिशोर (काका जी) यांची नियोजन बद्ध प्रचार यंत्रणा फारच मोलाची ठरली.
केज ! प्रतिनिधी
भाजपाच्या पदाधिकारी व एकनिष्ठ कार्यकर्ते यांनी लोकनेत्या आ.पंकजाताई यांना दिलेला विश्वास सार्थ करून दाखवला व आ. नमिताताई मुंदडा पुन्हा आमदार झाल्या.
केज मतदार संघात नुकत्याच झालेल्या निवडणूकित भाजपा महायुतीच्या उमेदवारां ना आलेले भरघोष यश म्हणजे स्व. लोकनेते गोपीनाथ रावजी मुंडे साहेब व लोकनेत्या आ.पंकजाताई मुंडे यांच्या वर आपार प्रेम करणारे तसे च आपार श्रद्धा, निष्ठा असणारे एकनिष्ठ, भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मा. आ.पंकजाताईंना दिलेला विश्वास सार्थकी लावत आ. नमिता ताई मुंदडा यांना अटीतटीच्या ठरलेल्या केज मतदार संघाच्या निवडणुकीत निवडून आणले व नमिता मुंदडा या पुन्हा आमदार झाल्या.
तसेच भाजपा चे थोर समाज सेवक, जेष्ठ सामाजिक नेते नंदकिशोर ( काकाजी ) यांनी लावलेली नियोजन बद्ध प्रचार यंत्रणा, आ. नमिता ताईंनी मागील पाच वर्षात केज मतदार संघात केलेली “न भूतो न भविष्यती” विकास कामे, यामुळे मतदार संघात पुन्हा कमळ फुलले आणि लोकनेत्या आ.पंकजाताई मुंडे यांचे हात बळकट झाले. तसेच राज्य शासनाने सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे महिलांनी दिलेला कौल हा महत्वाचा ठरला.
या निवडणुकी मध्ये भाजप महायुतीला जे घवघवीत यश मिळालं या मागे जेवढे लाडक्या बहिणीचे आशीर्वाद जेवढे कामी आले तेवढेच या विजयी उमेदवारांनी आपआपल्या मतदार संघात केलेल्या विकास कामांची मदत विजयश्री खेचून आणण्यात महत्वाची भूमिका बजावली.
यावेळी विधानसभेला चित्र बदललेलं दिसून आले संपूर्ण ओबीसी मतदार एकवटल्याचे दिसून आले.
शांततेत राहणाऱ्या कुठल्याही भानगडीत न पडणाऱ्या ओबीसी समाजाने या निवडणुकी मध्ये आपली ताकत महायुतीच्या बाजूने लावल्याचे दिसून येत आहे,या सह आणखी बरेच मुद्दे आहेत परंतु केज मतदार संघात फुललेलं कमळ म्हणजे लोक सभेच्या ॲक्शनची रिॲक्शन असे जनतेतून बोलले जात आहे तसेच भाजपा चे सर्व स्व. लोकनेते गोपीनाथ रावजी मुंडे साहेब आणि लोकनेत्या आ. पंकजाताई मुंडे यांच्या वर प्रेम करणाऱ्या भाजपा च्या सर्व एकनिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते सर्वांच्या एकजूटी चा हा विजय असल्याचे भाजपा तालुकाध्यक्ष भगवान केदार यांनी सांगितले.









Leave a Reply